accident in kolhapur college students dead in accident 
कोल्हापूर

दु्र्दैवी! आर्याच्या आयुष्यातील मैत्रिणींसोबतचा वाढदिवस ठरला शेवटचा ; वाटेतच तिच्यावर काळाने घातला घाला

सकाळ वृत्तसेवा

नागाव (कोल्हापूर) : भरधाव मोटारीच्या धडकेत मोपेडस्वार महाविद्यालयीन विद्यार्थिनी जागीच ठार झाली. तर तिच्या सोबत असणारी तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली. कु. आर्या संजय पाटील ( वय 17, रा. कोल्हापूर ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. कु. मल्लिका मन्सूर पठाण ( वय 17, रा. विठ्ठल नगर, शिये) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. शिये ( ता. करवीर ) येथील स्टोन क्रशर परिसरात शिये - भुये रोडवर दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात घडला.

याबाबत पोलिसांतून व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी : आर्या व मल्लिका या दोघी कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयात बारावी कॉमर्समध्ये शिकत आहेत. आज दुपारी ग्रुपमधील एका मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करुन आर्या आपल्या मोपेडवरून ( एमएच 09 बीआर 2285 ) मल्लिकाला घरी सोडण्यासाठी शियेला आली होती. मल्लिकाचे घर अवघ्या अर्धा एक किलोमीटर अंतरावर असेल. एवढ्यात शियेतून राष्ट्रीय महामार्गाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इर्टीका ( एमएच 09 एफजे 7070 ) मोटारीने आर्याच्या मोपेडला जोराची धडक दिली. या धडकेत आर्या व मल्लिका दोघी खाली पडल्या. पण मोटारीचे चाक आर्याच्या अंगावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. मल्लिकाला पडल्यामुळे हाताला गंभीर दुखापत झाली. तीला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : 'भारतासाठी ही स्थिती चिंताजनक, युद्ध थांबले नाही तर देशावर त्याचे गंभीर परिणाम होणार'; PM नरेंद्र मोदी यांचा इशारा

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; युद्धस्थिती शमल्याचा परिणाम

Latest Marathi News Live Update : रुपाली पाटील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Dhurandhar Movie Controversy: बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ आता कायद्याच्या रडारवर; बंदी घालण्याची मागणी

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

SCROLL FOR NEXT