कोल्हापूर

हत्तरगी-हिडकल डॅम मार्गावर दुचाकीच्या धडकेत गडहिंग्लजमधील दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर (कोल्हापूर) : हत्तरगी- हिडकल डॅम मार्गावर दुचाकीने रोडरोलरला धडक दिली. त्यात गडहिंग्लज तालुक्यातील नंदनवाड येथील दोघे जण ठार झाले. मंगळवारी (ता. २०) रात्री ही घटना घडली. अशोक मल्लाप्पा करगण्णावर (वय 39) व बसवराज भीमा कलगौडा (वय 29, दोघेही रा. नंदनवाड, ता. गडहिंग्लज) अशी मयतांची नावे आहेत. यमकनमर्डी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी,

अशोक करगण्णावर व बसवराज कलगौडा हे दोघेही मंगळवारी (ता. २०) रात्री उशिरा आपल्या दुचाकीने (एमएच 09 टीपी 0650) हिडकल डॅमकडून हत्तरगीकडे येत होते. त्यांच्या दुचाकीने वाटेत थांबलेल्या रोडरोलरला धडक मारली. त्यात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी बेळगावला घेऊन जाताना वाटेतच दोघांचे निधन झाले.

घटनास्थळी यमकनमर्डी पोलिसांनी निरीक्षक रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला. रात्रीची वेळ असल्याने अपघात कसा झाला याबाबत नेमकी माहिती घेण्यात येत आहे. यमकनमर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी गर्दी केली होती. यमकनमर्डी पोलिस पुढील तपास करीत आहेत. बुधवारी (ता. २१) या अपघाताबाबतची माहिती हत्तरगी परिसरात पसरल्याने दिवसभर चर्चा सुरू होती.

Edited By- Archana Banage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement: दिग्गज अष्टपैलूची ३५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा, दोन वर्षांपूर्वी खेळलाय शेवटचा कसोटी सामना

पुण्यात भाजपने दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांना दिलं तिकीट, निष्ठावंत नाराज; बंडखोरीची शक्यता

एवढी गर्दी की, 'थलपती' विजय कोसळला, जीवघेण्या प्रसंगातून थोडक्यात बचावला, viral video

CRPF Recruitment 2025: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी! 25,487 जागांसाठी भरती सुरू, 31 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

New Year 2026 : आपण कुठे चाललो आहोत?

SCROLL FOR NEXT