sakal
कोल्हापूर

कोल्हापूर: विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या युवकावर पोलीसांची कारवाई

विनापरवाना शस्त्र बाळगून त्याची विक्री करणाऱ्या तरुणाला आज पोलिसांनी ताब्यात घेतले

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: विनापरवाना शस्त्र बाळगून त्याची विक्री करणाऱ्या तरुणाला आज पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सानेगुरूजी येथे सापळा रचून ही कारवाई केली. अजित सुखदेव कांबळे (वय २४, रा.लक्ष्मीटेक परिसर, सानेगुरूजी वसाहत) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १ पिस्तुल २ काडतुसे असा सुमारे ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याची व्यापक मोहिम हाती घेतली. या अंतर्गत माहिती घेतली असताना कॉन्स्टेबल वैभव पाटील यांना एक तरुण शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसारत्यांनी सानेगुरूजी वसाहत येथील रावजी मंगल कार्यालयाजवळील मोकळ्या जागेत सापळा रचला. अजित हा येथे शस्त्र विक्रीसाठी आला. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ पिस्तुल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली. त्याला जूना राजवाडा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले, नेताजी डोंगरे, श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, उत्तम सडोलिकर, रणजीत कांबळे, संजय पडवळ, संतोष पाटील, रणजीत पाटील, रफिक आवळकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शंभरदा फोन केला, पाणी मिळेना, रस्त्यात खड्डे; स्टेजवरच बीडच्या खासदारांना तरुणाचा सवाल, माइक हिसकावल्यानं गोंधळ

Vaibhav Sooryavanshi Wicket : कर्णधार म्हणून वैभव सूर्यवंशीने पदार्पणात किती धावा केल्या? बघा कसा सहज OUT झाला, Video Viral

Sheikh Hasina: शेख हसीना बांगलादेशात माघारी जाण्याच्या तयारीत; भारताने ठेवल्या 'या' दोन अटी

Parbhani: अडीच वर्षे हरवलेल्या महिलेचा AI ने शोधला पत्ता! ChatGPT आणि Google च्या मदतीने परभणीतील कुटुंबाशी पुनर्भेट

बेजबाबदारपणाची पण हद्द असते! बोगद्यात गाडी थांबवून फोडले फटाके; Video Viral

SCROLL FOR NEXT