action will be on Direct production value of N Mask n95 seal different rate 
कोल्हापूर

आता खैर नाही! एन- 95 मास्क, वैद्यकीय साहित्यांच्या दरात फसवणूक करणाऱ्यांवर होणार फौजदारी

सुनील पाटील

कोल्हापूर : कोरोनाच्या परिस्थितींचा फायदा घेत एन- मास्क 95 चे प्रत्यक्ष उत्पादन मूल्य, बाजारातील दर व पुरवठादारास मान्य केलेला दर यामध्ये फार मोठी तफावत दिसून येत आहे. हे सर्व साहित्य, उपकरणे, औषधे यांच्या खरेदीमध्येअशा प्रकारे तफावत आहे किंवा कशी? याची तात्काळ चौकशी करून दोषी पुरवठादारांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

कोव्हिड- मुळे निर्माण झालेल्या परिस्थिताचा गैरफायदा घेवून अवैध खरेदीची ग्राहक संरक्षण कायदा तसेच औषधे किंमत नियंत्रण आदेशांतर्गत तपासणी करावी. अशा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना एका पत्राद्वारे दिले आहेत. 

जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोरोना संसर्गाचा गैरफायदा घेवून उत्पादन मूल्य किंवा प्रचलित बाजार भावापेक्षा जास्त दराने निविदा मान्य करुन पुरवठादाराकडून शासनाची फसवणूक केली जात आहे. अशा पुरवठादारांची चौकशी करावी. दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय साहित्य, औषधे व उपकरणे, तपासणी किट खरेदी केली आहे. सर्व प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पार पाडली आहे. शासकीय नियमाप्रमाणे व पारदर्शक पध्दतीने साहित्य खरेदी होणे बंधनकारक होते. मात्र या प्रक्रियेमध्ये काही पुरवठादारांनी मोठया प्रमाणात दर आकारुन निविदा मान्य केली आहे. एन- मास्क 95 चे प्रत्यक्ष उत्पादन मूल्य, बाजारातील दर व पुरवठादारास मान्य केलेला दर (निविदा प्रक्रियेव्दारे) यामध्ये फार मोठी तफावत दिसून येत आहे. याची आवश्‍यक ती तपासणी करावी. अनावश्‍यक साहित्य किंवा अनावश्‍यक खरेदी झालेली नाही, याचीही चौकशी करावी. कोव्हिड- मुळे निर्माण झालेल्या परिस्थिताचा गैरफायदा घेण्यासाठी केलेली असल्याने अवैध कृत्याचा ग्राहक संरक्षण कायदा तसेच औषधे किंमत नियंत्रण आदेशांतर्गत तपासणी होऊन कारवाई करावी. 
 
  बील देवू नये 
वैद्यकीय साहित्यांचे पुरवठादारांनी मान्य केलेला दर, खुल्या बाजारातील दर व उत्पादन मुल्यातील तफावत असल्यास संबंधीत पुरवठादारास कोणत्याही परिस्थितीत साहित्यांचे बिल देवू नयेय. याबाबत आवश्‍यक ती खात्री करून योग्य दर निश्‍चित करावा व त्याप्रमाणात बीले द्यावे, अशा सूचनाही श्री देसाई यांनी दिल्या. 

 अशी होणार चौकशी : 
- ज्या पुरवठादारांनी अशा प्रकार शासनाची फसवणूक केली आहे 
- उत्पादन खर्च, बाजार मुल्यू आणि प्रत्यक्ष विक्री यातील तफावत 
- विविध साहित्य, उपकरणे याची अनावश्‍यक खरेदी 
- जादा दराने घेतलेल साहित्य 
- जादार दराची जबाबदारी निश्‍चित केली जाणार 
- विविध कोव्हिड रुग्णालयांना वितरित केलेले साहित्याचा आढावा 
- साहित्यांचा वापर योग्य रित्या व शासकीय नियमाप्रमाणे झाल्या आहे का? 

 अशी होणार कारवाई : 
- कोव्हिड- मुळे निर्माण झालेल्या परिस्थिताचा गैरफायदा घेवून अवैध खरेदीची ग्राहक संरक्षण कायदा तसेच औषधे किंमत नियंत्रण आदेशांतर्गत तपासणी 
- फसवणुक करणाऱ्या पुरवठादारावर फौजदारी गुन्हे 
- पुरवठादारांचा काळया यादी समावेश होणार 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT