Admapur Balumama 131st Birth Anniversary Celebration esakal
कोल्हापूर

Admapur Balumama : बाळूमामांच्या जन्मकाळ सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी; भंडाऱ्यानं माखली आदमापूरनगरी

बाळूमामांच्या जन्मकाळ सोहळ्यासाठी भाविकांनी आदमापूरला गर्दी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

बाळूमामांचे मंदिर, गाभारा, समाधीस्थळ व मूर्तीला फुलांनी आकर्षक सजावट केली होती.

मुरगूड : बाळूमामांच्या नावानं चांगभलं...चा जयघोष, ढोल-कैताळाच्या निनादात, पुष्पवृष्टी व मुक्तहस्ते भंडाऱ्याची उधळण करत श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा यांचा १३१ वा जन्मकाळ सोहळा झाला.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामांच्या (Admapur Balumama) जन्मकाळ सोहळ्यासाठी भाविकांनी आदमापूरला गर्दी केली होती. बाळूमामांचे मंदिर, गाभारा, समाधीस्थळ व मूर्तीला फुलांनी आकर्षक सजावट केली होती.

बुधवारी (ता. २५) पहाटे श्रींची नित्य पूजा, अभिषेक, आरतीने जन्मोत्सवास प्रारंभ झाला. राजनंदिनी भोसले यांच्याहस्ते वीणापूजन झाले. सायंकाळी बाळासाहेब पाटील यांचे प्रवचन, नानासो पाटील यांची कीर्तन सेवा झाली. माणगावच्या धनगरी बांधवांचे ढोलवादन, आदमापूरच्या भजनी मंडळाने हरी जागर केला.

बाळूमामांचे निर्वाणस्थळ मरगुबाई मंदिरातून श्रींच्या अश्वासह भंडारा समाधीस्थळी आणला. याप्रसंगी भाविक, सुवासिनींनी पालखीसह अश्वाचे औक्षण केले. यावेळी प्रशासक शिवराज नाईकवडे, धैर्यशील भोसले, दत्तात्रय पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : कात्रज उद्यानातील ऑनलाईन बुकिंगला प्रतिसाद; दोन वर्षांत ५ लाख ४४ हजार ६३ पर्यटकांकडून ऑनलाईन बुकिंग!

Oral Cancer Risk Prediction: जनुकांद्वारे समजेल कुणाला तोंडाच्या कर्करोगाचा धाेका; टाटा मेमोरियल सेंटर व ‘अ‍ॅक्ट्रेक’चे संशोधन

Khadakwasla Theft : खडकवासला सोसायटीतील चार बंद सदनिका फोडल्या; ४ अज्ञात चोरट्यांकडून सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास!

Municipal Employee Pay : समाविष्ट गावांतील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात आणि पदावनती; आयुक्तांनी पुनर्विचार आदेश दिला!

Latest Marathi News Live Update : नंदुरबार येथील मतदान केंद्रांवर दोन गटात राडा

SCROLL FOR NEXT