Adv yuvraj Narvankar on Forbes list kolhapur marathi news 
कोल्हापूर

कोल्हापूरचे ॲड. युवराज नरवणकर भारतातील सर्वोत्तम आणि प्रभावशाली फोर्ब्सच्या यादीत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  जगद्विख्यात फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वोत्तम आणि प्रभावशाली वकिलांच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये ॲड. युवराज नरवणकर यांचा समावेश केला आहे. दरवर्षी उद्योग क्षेत्रातील नामांकने फोर्ब्सतर्फे जाहीर केली जातात. यावर्षी पहिल्यांदाच कायदा क्षेत्राचा समावेश नामांकनामध्ये केला होता. 

ॲड. नरवणकर मूळचे कोल्हापूरचे आहेत. न्यायालयातील अनुभव, विविध क्षेत्रातील काम आणि इतर आव्हानात्मक निकष नामांकनासाठी वापरले जातात. यावर्षीच्या नावांची निवड करणाऱ्या पॅनेलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मदन लोकूर, न्यायमूर्ती ए. के. सिक्री, सहसॉलिसिटर जनरल सर्वोच्च न्यायालयातील सिद्धार्थ लुथ्रा यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिवक्ता आणि चार नॅशनल लॉ स्कूलचे कुलगुरू यांचा समावेश होता. 

काल दिल्ली येथे व्हर्च्युअल स्वरूपात झालेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या नावाची घोषणा झाली. लवकरच कार्यक्रमाचे प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर होणार आहे. ॲड. नरवणकर सध्या मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असून अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये आणि याचिकांमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. नुकतीच केंद्र सरकारच्या नाणेनिधीचे प्रमुख कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT