After Independence In Chinchewadi And Masewadi Villages Grain Shop Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

स्वातंत्र्यानंतर या दोन गावांना मिळाले स्वस्त धान्य दुकान...

अमर डोमणे

हरळी : स्वातंत्र्याला 70 वर्षे उलटली तरी अद्याप काही गावांमध्ये जीवनावश्‍यक सुविधा पोहचलेल्या नाहीत. तालुक्‍यातील चिंचेवाडी आणि मासेवाडी ही दोन गावेही त्याला अपवाद नव्हते. या दोन्ही गावात शासनाचे स्वस्त धान्य दुकानाची सुविधा उपलब्धच नव्हती. परिणामी चिंचेवाडीकरांना चन्नेकुप्पी तर मासेवाडीतील कार्डधारकांना मुंगूरवाडीत जाऊन धान्य आणावे लागायचे. सातत्याने पाठपुरावा करून या गावांमध्ये आता स्वस्त धान्य दुकान सुरू झाले आहेत. यामुळे कार्डधारकांचे हेलपाटे वाचले असून पाठपुराव्याला यश आले आहे. 

ऐतिहासिक किल्ले सामानगडच्या पायथ्याशी वसलेले चिंचेवाडी गाव. गावात 250 रेशन कार्डधारक. परंतु गावात स्वातंत्र्यापासून दुकानच नव्हते. परिणामी चार किलोमीटरवरील चन्नेकुप्पीच्या दुकानाला हे गाव जोडले होते. गाडी मिळाली तर ठीक नाही, तर शेतवडीतील वाट तुडवत हे लोक चन्नेकुप्पी गाठायची. धान्य मिळाले, तर ठीक नाही तर रिकाम्या हाताने माघारी जावे लागायचे. हा त्रास वर्षानुवर्षे सुरू होता.

अखेर गावातील सर्जेराव कदम, पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, अर्जून सुतार आदींनी पुरवठा विभागाकडे अर्ज सादर केला. 2017 मध्ये हनुमान दूध संस्था संचलित महिला गटाच्या नावे निविदा भरली. त्यानंतरही गावात दुकान सुरू होण्यासाठी तीन वर्षाची प्रतीक्षा करावी लागली. अखेर मंगळवारपासून (ता. 9) गावातच धान्य दुकान सुरू झाले. आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते धान्य वाटप झाले.

या वेळी पं. स. उपसभापती श्रीया कोणकेरी, सदस्य विजय पाटील, रामाप्पा करिगार, अमर चव्हाण, अनिकेत कोणकेरी, सरपंच सुरेखा सुतार, सर्जेराव कदम, अर्जून सुतार, आप्पा घेवडे, तानाजी परीट, वसंत कदम, धनंजय कदम, सयाजी कदम, राजेंद्र कदम, रवी भिमगुडे, जोतिबा घेवडे, राजू कांबळे, दत्ता घेवडे, मनोज बिरजे, विनोद शिंदे आदी उपस्थित होते. यासाठी तत्कालीन तहसीलदार राजेश चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांचे सहकार्य मिळाले. 

मासेवाडीकरांचेही ग्रहण सुटले 
मासेवाडीतही दोनशे रेशनकार्डधारक आहेत. त्यांना मुंगूरवाडी दुकानाला जोडले होते. वर्षापूर्वी ब्रम्हदेव दूध संस्थेच्या नावे अर्ज करून दुकानाची मागणी केली होती. येथेही परवानगी मिळाली. यासाठी सरपंच यल्लूबाई पाटील, दशरथ कुपेकर, पिरगोंडा कापसे, अर्जून खामकर, शरद नवाळे आदींनी पाठपुरावा केला. 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT