Aggressive youth should be protected; In the grip of crime, the future is in danger 
कोल्हापूर

आक्रमक तरूणाईला आवर हवा ;  गुन्हेगारीच्या विळख्यात, भवितव्य धोक्‍यात 

राजेश मोरे

कोल्हापूर : एकमेकांकडे बघितले, मुलीसोबत चहा घेतला, गाडीवर बसलास, अशा शुल्लक कारणावरून शहर परिसरात हाणामाऱ्याचे प्रसंग घडत आहेत.खून, प्राणघातक हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्यात तरुणाई अडकण्याचे प्रमाण वाढू लागले. 
गरम रक्ताच्या आक्रमक तरूणाईला वेळीच आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे. 
ताराबाई पार्क परिसरात एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघे संशयित तरूण खूनाच्या गुन्ह्यात अडकले. खासबाग परिसरात गाडीवर बसल्यावरून मारामारी झाली. 

नवीन वाशीनाका परिसरात मुलीबरोबर चहा पिणाऱ्या तरूणावर प्राणघातक हल्ला झाला. राजेंद्रनगरात पूर्ववैमनस्यातून तरूणाला सळीने मारहाण केली. मिरजकर तिकटी परिसरातील हॉटेलमध्ये टेबलावर बसल्याच्या कारणावरून मारहाण झाली. अशा शुल्लक कारणावरून हाणामारीचे प्रकार दिवसेंदिवस घडू लागलेत. अशा गुन्ह्यात तरूणवर्गच मोठ्या प्रमाणावर अडकत असल्याचे चित्र आहे. टेंबलाई उड्डाणपूल परिसरात झालेल्या डब्बल मर्डरमध्ये अडकलेल्या तरूणांना तर आजन्म कारवासाची शिक्षा सुनावली. 

आपल्याला जे सुख मिळाले नाही ते सर्व मुलाला मिळाले पाहिजे या मानसिकतेतून मुलांचे हट्ट पुरविणाऱ्या पालकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महाविद्यालयात गेल्याबरोबर आज कालच्या मुलांच्या हातात गाडी, मोबाईल असे अशा किमंती वस्तू दिसत आहेत. मुलांनी शिकून आपले करिअर करावे, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. पण आज तरूणांच्या हातात पुस्तकांच्या ऐवजी दिसणारी काठ्या, गज, चाकू अशी हत्यारे पालकांची चिंता वाढवत आहे. 


कळंबा कारागृहातील बंदीची संख्या... 
वयोगट संख्या 
*18 ते 30 981 
*31 ते 50 829 
*51 वर्षावरील 150 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: शिंदेसेनेने डोंबिवलीत खाते उघडले! कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा तिहेरी बिनविरोध विजय

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Viral Video: नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धीविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, रांग पाहून बसेल धक्का

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT