Agricultural Reform Bill form Act raju shetti tweet 
कोल्हापूर

नव्या विधयकातून शेतकरी कार्पोरेट कंपन्याच्या दावणीला ; राजू शेट्टी यांचा केंद्र सरकारवर रोष

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  कृषी सुधारणा विधेयक कायद्यावरून देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक शेतकरी नेत्यांनी या कायद्याला जोरदार विरोध केला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या कायद्यावरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ' कार्पोरेट कंपन्या शेतकर्ऱ्याना हमीभाव द्यायला बांधील नाहीत, मग यातून आमच्या शेतकर्यांना हमीभाव कसे मिळणार, याची कुठेही या कायद्यात तरतूद नाही. शेतकर्यांना यामधून काहीच मिळणार नाही. ' अशी टिका राजू शेट्टी यांनी आपल्या ट्टिव्टर अकौंटवरून केली आहे.

'सरकार हमीभावाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहत आहे. देशात कॉन्ट्रक्ट शेती असल्यास शेतकऱ्यांचे भले होईल, असे आभासी चित्र निर्माण केले जात आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या संघटना या विधेयकाचा यासाठीच विरोध करत आहेत. अकाली दलासारखा ग्रामीण भागात वाढलेला पक्षही शेतकरी विरोधी कायदा आहे, म्हणून सत्तेतून बाहेर पडत आहे. यावरूनच या कायद्याला ग्रामीण भागातून किती विरोध आहे, हे दिसते. कार्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला बांधील नाहीत, मग यातून आमच्या शेतकर्यांना हमीभाव कसे मिळणार, याची कुठेही या कायद्यात तरतूद नाही. शेतकऱ्यांना यामधून काहीच मिळणार नाही,' अशी टिका राजू शेट्टी यांनी केली आहे.
 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा कायम! पुढचे काही दिवस पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज काय?

Karnataka Accident: राज्यात दोन अपघातांत सात जण ठार; कोलार, चिक्कबळ्ळापुरात दुर्घटना, तिरुपतीहून परतताना काळाचा घाला

IND vs AFG : अफगाणिस्तानच्या 'त्या' कृतीने पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या! भारताचा नकाशा अन् जगासमोर आणले सत्य… नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटलांवर मध्यरात्री उपचार, सलाइन लावले

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

SCROLL FOR NEXT