agriculture Multipurpose four wheeler
agriculture Multipurpose four wheeler  सकाळ
कोल्हापूर

लय भारी! दुचाकीच्या इंजिनपासून चारचाकी, इस्लामपूरच्या 'रँचो'ची कमाल

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : पेठ रस्त्यावरील विष्णुनगरमधील कुमार पाटील(Kumar Patil) या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील ज्ञानाचा वापर करत कल्पकतेने शेतकऱ्यांसाठी चारचाकी गाडी तयार केली आहे. आंतरमशागतीची कामे या गाडीने सहज करता येतात. दुचाकीच्या इंजिनचा वापर करून तयार केलेली चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. एक वर्ष मेहनत घेऊन तयार केलेल्या गाडीची अंतिम चाचणी रविवारी, १६ जानेवारी रोजी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्याने कुमार पाटील यांना मोठा आनंद झाला आहे.

कुमार पाटील यांचा वीस वर्षांपासून फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी छोटी मोठी अवजारे तयार करून देत आहेत. त्यातून शेतकऱ्यांसाठी अजून काही वेगळे करण्याची जिद्द मनात निर्माण झाली. त्यातून त्यांना चारचाकी गाडीची कल्पना सुचली. गाडीसाठी लोखंडी साहित्य वापरताना दुचाकी गाडीचे इंजिन वापरण्याचे ठरविले. १०० सीसी क्षमतेचे इंजिन घेत त्यापासून चारचाकीची निर्मितीचा प्रयत्न केला. दोनवेळा तयार केलेला गाडीचा सांगाडा काही कारणाने मोडला. जास्तीत जास्त वेळ फॅब्रिकेशन व्यवसायात घालवत असल्याने कुटुंबीय नाराज होते. तरीसुद्धा कुमार यांनी प्रयत्न सोडला नाही. चारचाकी गाडी बनविण्याचा चंग मनात पक्का बांधला होता.

चारचाकी गाडी बनवताना त्यांनी स्टेअरिंगऐवजी दुचाकीचे हॅण्डल वापरले. इंजिन दुचाकीचे असूनसुद्धा रिव्हर्स गिअर बॉक्स स्वतःच्या कल्पकतेने तयार केला. चारचाकीप्रमाणे गिअर टाकून गाडीमागे-पुढे घेता येईल असा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला. त्यानंतर शेतीपूरक अवजारे कशी जोडता येतील यासाठी मित्रांशी चर्चा करून तशी व्यवस्था केली.

सामान्य शेतकऱ्यांला कोळपणी, नांगरट, पेरणी, फवारणी या शेतीतील कामासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. खडतर रस्त्यावर कमीतकमी जागेत सहजपणे गाडी नेता येणार आहे. अरुंद जागा, शेतीत गाडीचा वापर कसा करता येईल याचा विचार केला आहे. शेत, गोठ्यात, खाद्याची पोती, वैरण आणण्यासाठी सीटमागे दोन्ही चाकांच्या गार्डवर तशी रचना केली आहे.

कुमार पाटील यांनी एका शेतकऱ्याच्या शेतात नुकतीच चाचणी घेतली. १ लिटर पेट्रोलमध्ये साधारण १ एकर क्षेत्रातील कोळपणीचे काम ही चारचाकी गाडी अगदी सहज पणे करत आहे. अल्पवेळेत व कमी खर्चात चारचाकी गाडी काम करीत असल्याने शेतकऱ्यांना ती वरदान ठरणार आहे.

कमी खर्चात निर्मिती

कुमार पाटील यांनी बनवलेल्या चारचाकी गाडीसाठी दुचाकीचे टायर, हॅन्डल, दोन चाकसाठी दोन ब्रेक, बसण्यासाठी सिटची व्यवस्था, लोखंडी अँगल व पाईपच्या माध्यमातून चारचाकी गाडी साकारली आहे. ४० ते ५० हजारांचा माफक खर्च आला. गाडीचा देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी आहे. माफक दरात चारचाकी दारात आणण्याचे शेतकऱ्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

‘‘शेतकऱ्यांना कमीत कमी कालावधीत, कमी खर्चात जास्तीत जास्त शेतातील काम पूर्ण करणे. मशागत चांगली व्हावी हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन या चारचाकीची निर्मिती केली आहे.’’

- कुमार पाटील, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT