Ajit Pawar Sakal
कोल्हापूर

अजित पवारांचा कोल्हापूर दौरा रद्द, सांगलीत दाखल

अर्चना बनगे

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर पूरस्थिती पाहण्यासाठी नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. आज सकाळी नऊ वाजता ते कोल्हापूर येथे येणार होते. मात्र ढगाळ वातावरणामुळे कोल्हापूर ऐवजी ते सांगलीकडे रवाना झाले. नुकतेच ते सांगलीत दाखल झाले आहेत. भिलवडी निवारा केंद्राची पाहणी सुरु केली आहे.

सांगली दौऱ्यानंतर ते कोल्हापूर कडे येतील असे वाटले होते. मात्र त्याऐवजी ते सांगलीचा दौरा आटोपून सातारा कडे रवाना होणार आहेत. राज्यात अनेक भागात पूरस्थितीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विविध भागाचा दौरा करत आहेत. Ajit-Pawar-Kolhapur-flood-visit-cancelled-sangli-palus-visit-satara-rain-update-akb84

उपमुख्यमंत्री अजित पवार नियोजित वेळेनुसार आज सकाळी नऊ वाजता कोल्हापूर येथे येणार होते. या ठिकाणी पूरग्रस्तांना भेटल्यानंतर ते प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी बरोबर चर्चा करून एकूण पूरिस्थितीचा आढावा घेणार होते. त्यानंतर शिरोळ या ठिकाणी जाऊन ते पुरग्रस्तांना भेटणार होते. शिरोळ दौऱ्यानंतर ते सांगली कडे रवाना होणार होते. मात्र आज सकाळी कोल्हापूर येथील हवामान अत्यंत ढगाळ होते. त्यामुळे हेलिकॅप्टर उतरू शकत नसल्याने ते थेट कोल्हापूर ऐवजी सांगली कडे रवाना झाले. सांगली दौरा आटोपल्यानंतर ते कोल्हापूरला भेट देतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र त्यांनी आता सांगली नंतर साताऱ्याकडे रवाना होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे स्टेशनच्या कॅन्टीनमध्ये किळसवाणा प्रकार! सँडविचसाठी वापरणाऱ्या टोमॅटोवर उंदराचा वावर, Viral Videoनंतर रेल्वेची कारवाई

MPSC Quota Change: एमपीएससी सरळ भरतीतील ६०-४० गुणोत्तर बदलावर काँग्रेसचा संताप; नव्या जीआरला अन्यायकारक ठरवत रद्दची मागणी

"माझा, आवडता पार्टनर!" विराट कोहलीची भावनिक पोस्ट; अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकर ते वीरूपर्यंत सर्व झाले व्यक्त

CMO Office: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ता बदलणार! आता 'ही' इमारत सत्तेचे नवे केंद्र बनणार; सरकारचा मोठा निर्णय

Pune Burglary Spree: पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच; मार्केट यार्ड, वारजे, लोहगाव, महर्षीनगरमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला

SCROLL FOR NEXT