चंदगड : येथील नगरपंचायतीकडील मुख्याधिकाऱ्यांपासून सर्वच अधिकारी विविध कारणांनी रजेवर असल्याने त्यांच्याकडील खाती प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहेत. शहरवासीयांनी मोठ्या अपेक्षेने नगरपंचायतीचा आग्रह धरून ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवला. परंतु आता अधिकारीच नसल्याने कामाचा उरक मंदावला आहे. पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे काम चांगले आहे. काम करण्याची इच्छाही आहे. परंतु मंजुरी देणारे अधिकारीच अल्पवेळ उपलब्ध होत असल्याने विकासकामांवर परिणाम जाणवत आहे.
मुख्याधिकारी अभिजित जगताप दीर्घ रजेवर आहेत. त्यांचा पदभार गडहिंग्लज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे आहे. आजरा येथील पदभारही त्यांच्याकडेच असल्याने तीन ठिकाणी वेळ देताना त्यांची तारेवरची कसरत होत आहे. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी सचिन शिंदे यांची विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाल्याने ते सुध्दा रजेवर आहेत. त्यांच्या जागी अद्याप कोणीही आलेले नाही.
नगर अभियंता ऋषीकेश साबळे अपघातामुळे रजेवर आहेत. त्यांचा पदभार गडहिंग्लज नगरपरिषदेचे अधिकारी पोतदार यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रभारी अधिकाऱ्यांना कामाच्या मुख्य ठिकाणच्या कामाचा उरक करुनच उर्वरीत वेळ या नगरपंचायतीला द्यावा लागतो. नगरपंचायतीचा प्रशासकीय कारभार नियमानुसार करावा लागतो. अधिकाऱ्यांच्या सहीशिवाय कामच होऊ शकत नाही. कर्मचाऱ्यांनी अल्पावधीत प्रशासकीय कारभार आत्मसात केला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यावर कामाचा ताण वाढला आहे. अद्याप कर्मचाऱ्यांचे समायोजन झालेले नाही. त्यांची फाईल पुण्यात प्रलंबित आहे. नऊ लिपिक गरजेचे असताना केवळ चार जणांकडून हे काम केले जात आहे. सुमारे 65 लाख रुपये घरफाळा, पाणीपट्टी व इतर वसुलीचे काम करताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे त्रास होत आहे.
मागणी केली आहे
प्रमुख अधिकारी नसल्यामुळे कामावर परिणाम जाणवत आहे. अधिकारी व कर्मचारी नियुक्तीसंदर्भात आमदार राजेश पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.
- प्राची काणेकर, नगराध्यक्षा, चंदगड नगरपंचायत
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.