All transactions started, so what have the libraries done? 
कोल्हापूर

सर्व व्यवहार सुरू, मग ग्रंथालयांनीच काय घोडे मारले आहे?

मतीन शेख

कोल्हापूर : ज्ञानाचा, वाचनाचा संस्कार पुस्तके, वाचनालये करत असतात. राज्यात वाचन संस्कृतीचा मोठा इतिहास आहे. कोरोना महामारीत लॉकडाउनमध्ये ग्रंथालयांना ठोकलेले टाळे अजून कायम आहे. राज्यशासनाने लोकांवर संस्कार करणारी पुस्तकालये मात्र अद्याप लॉकडाउनच आहेत. शासनाने तत्काळ वाचनालये, अभ्यासिका सुरू कराव्यात अशी मागणी पुस्तकप्रेमींतून होत आहे. 
कोल्हापुरात करवीर नगर वाचन मंडळ, भास्करराव जाधव वाचनालय यासारखी जुनी वाचनालये आहेत. या वाचनालयांचे हजारो सभासद आहेत. शहरात प्रत्येक वार्डात पुस्तक पेढी उभारुन वाचन चळवळ उभा राहिली होती. ग्रामीण भागात ही गावोगावी ग्रंधालये आहेत. साहित्यिक, ज्येष्ठ नागरिक, संशोधक, विद्यार्थी अशा पुस्तक प्रेमी व्यक्ती वाचनाला पुस्तके उपलब्ध होत नसल्याने अस्वस्थ आहेत. शासन मद्यालयांना परवानगी देतंय पण विचारांची पेरणी करणारी ग्रंथालये, अभ्यासिका मात्र बंद ठेवत आहे. 
ग्रंथालये धूळखात पडल्याने पुस्तकांची निगा तसेच व्यवस्थापनांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनलॉकनंतर अनेक घटकांना सवलत दिल्याप्रमाणे ग्रंथालये, वाचनालये, अभ्यासिका या वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी सुरू करणे गरजेचे आहे. 

अशी खबरदारी घेणे शक्‍य... 
वाचनालयात मास्क, सॅनिटायझरचा वापर 
शिस्तीत पुस्तक वितरण 
साहित्यिक कार्यक्रम टाळणे 
ज्येष्ठांना घरपोच पुस्तक सेवा 
जमा होणाऱ्या पुस्तकाचे विलगीकरण 


कोरोना काळात न वाचनारी लोकं ही वाचू लागली. पुस्तके विकत घेऊ लागली. अनेकांना ग्रंथालयाची गरज आहे. लोकांचे वाचन थांबले आहे. ग्रंथालयात लोक झुंडीने येत नसतात. इथला व्यवहार अगदी शिस्तीत असतो. नियमानुसार व्यवस्थापन काळजी घेईल, परंतु शासनाने ग्रंथालये खुली करावीत 
- डॉ. रमेश जाधव, ज्येष्ठ इतिहास संशोधक 

मद्यालये सुरु परंतु ग्रंथालये मात्र बंद, हे प्रगल्भ राज्यकारभाराचे लक्षण नाही. लोकांना ज्ञानी करणारी ग्रंथालये बंद आहेत ही गोष्ट पटणारी नाही. लोकांच्या मनात वाचन प्रेमी वाढवायचे असेल तर वाचनालये, विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका सुरू करणे गरजेचे आहे. 
प्रा. सुनीलकुमार लवटे, ज्येष्ठ साहित्यिक 

ज्ञानाच्या माध्यमातून समाजाची प्रगती होते, पण वाचनालयांनाच टाळे असल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. वाचनाची सवय असणाऱ्यांना ही बाब अस्वस्थ करणारी आहे. लोक वाचनालयात स्वंयशिस्त पाळतील, तरी हे टाळे उघडले जावे. 
- चंद्रकुमार नलगे, ज्येष्ठ साहित्यिक.

- संपादन यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT