alternative annoying treatment of cancer Research by Vishwajeet Khot kolhapur marathi news latest news 
कोल्हापूर

कर्करोगांवरील त्रासदायक उपचाराला पर्याय:  डॉ. विश्‍वजित खोत यांचे संशोधन

नंदिनी नरेवाडी- पाटोळे

कोल्हापूर :  जगभरात कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारपद्धतीबाबत संशोधन होत आहे. यात केमोथेरपी आणि सर्जरीला पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या उपचार पद्धतींचा समावेश आहे. अशाच पद्धतीच्या साईड इफेक्‍ट कमी करणाऱ्या ‘मॅग्नेटिक नॅनो पार्टिकल फॉर डायग्नोसिस ॲण्ड थेरपी ऑफ कॅन्सर’ या विषयावर कोल्हापुरातील डॉ. विश्‍वजित महिपती खोत यांनी संशोधन केले आहे. सध्या प्रचलित असलेल्या केमोथेरपीत कर्करोगाच्या पेशीसोबत शरीरातील इतर अवयवांवर परिणाम होऊन रुग्णांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागते. डॉ. खोत यांनी संशोधन केलेल्या थेरपीत शरीरातील कर्करोगाच्या पेशींना ‘लक्ष्य’ करून नॅनो पार्टिकल्सचा वापर करून उपचार केले जाणार आहेत. 


‘मॅग्नेटिक नॅनो पार्टिकल फॉर डायग्नोसिस ॲण्ड थेरपी ऑफ कॅन्सर’ या विषयावरील संशोधनात त्यांनी एमआरआयचा वापर करून रुग्णांना दिलेल्या औषधांचा शरीरातील नेमक्‍या कर्करोगाच्या पेशींवरच उपचार केला जाणार आहे. त्यांच्या संशोधनामुळे कर्करोगावरील उपचार पद्धती नेमकी व सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे.

डॉ. खोत मूळचे इचलकरंजीचे. दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयातून त्यांनी एमएस्सीचे शिक्षण घेतले. त्यानंतर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात त्यांनी ‘मॅग्नेटिक नॅनो पार्टिकल फॉर डायग्नोसिस ॲण्ड थेरपी ऑफ कॅन्सर’ या विषयात संशोधन सुरू केले व पीएच.डी. संपादन केली. त्यांना कौन्सिल ऑफ सायंटिसिक ॲण्ड इंडस्ट्रियल रिसर्चकडून सीनिअर रिसर्च फेलोशिप मिळाली. त्यांना या संशोधनामुळे २०१५ साली युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन व रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ग्रेट ब्रिटन येथे पोस्ट डॉक्‍टरल रिसर्च असोसिएटस्‌ म्हणून संशोधनाची संधी मिळाली. सध्या युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्‍सफर्डसोबत याच विषयातील त्यांचे संशोधन अंतिम टप्प्यात आले आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Research Funding: पुणे-मुंबईसह देशातील संशोधकांना मोठी संधी; युरोपचे ९३.५ अब्ज युरोचे दार उघडणार!

Political Storm in Kolhapur : "हा मोर्चा गोकुळसाठी नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदासाठी"; उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुश्रीफांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Kapil Sharma Show : "लाल मंच्युरियन पिले पड गये..."; महाराष्ट्राचे 'डॅशिंग' IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर सुनील ग्रोव्हरची भन्नाट कविता, VIDEO तुफान व्हायरल!

Climate Summit: जगाची चिंता वाढली! युद्ध आणि AIमुळे हवामान बदलाचे आव्हान झाले आणखी अवघड

Maharashtra Live News: वाचा देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT