Although children can be seen chirping on Rankala Chowpatty toys it is up to the parents to put some restrictions on these games as the corona infection is on the rise
Although children can be seen chirping on Rankala Chowpatty toys it is up to the parents to put some restrictions on these games as the corona infection is on the rise 
कोल्हापूर

Video : बागा बंद तरी किलबिलाट :रंकाळा उद्यानात चिमुकल्यांची गर्दी

मोहन मेस्त्री

कोल्हापूर : पाच-सहा महिन्यांपासून शहरातील बागा आणि बालोद्याने कुलूपबंद आहेत. कोरोनामुळे सर्व नागरिक घरात आहेत. ‘कामाशिवाय बाहेर पडू नका’ या नियमाने मुलांचे घराबाहेर पडणे बंद झाले. घरात टीव्ही आणि ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने मोबाईल या दोनच विश्‍वात रमलेल्या लहान मुलांची पावले आता घरात थांबेनाशी झालीत. त्यामुळे अनेक पालकांनी बंद असलेल्या बागांमध्ये आडमार्गाने प्रवेश मिळवून मुलांना खेळण्यासाठी जागा करून दिली आहे. रंकाळा चौपाटीच्या खेळण्यांवर मुलांचा किलबिलाट दिसत असला, तरी  कोरोनाचा संसर्ग वाढता असल्याने पालकांनीच या खेळांवर काहीसे बंधन घालणे गरजेचे आहे.
 

कोरोना लॉकडाउनमुळे पाच महिने शाळा त्यासोबत उद्याने आणि चौपाटीही बंद आहे. त्यामुळे मुलांचे खेळणेही बंद झाले आहे.  घराबाहेर जाण्यास पालकांनी परवानगी देत नाहीत. लॉकडाउन निघाले व्यवहार सुरू झाले, पण बागांचे लॉक निघाले नाहीत. घरात बसून मुले टीव्ही आणि मोबाईलवर वेडी होतात की काय अशी परिस्थिती आली आहे. रंकाळ्या जवळच्या नागरिकांनी  सायंकाळी कठड्यावर बसण्यास सुरवात केली होती. चौपाटी आणि बाग यांची प्रवेशद्वारे बंद असली तरी टॉवर ते शालिनी पॅलेस दरम्यानची चौपाटी आणि राजकपुर पुतळ्याजवळील मुलांची खेळणी आता सायंकाळनंतर मुलांनी भरून जात आहेत. लहानमुलांचा किलबिलाट खेळण्यांवर दिसत आहे. चौपाटीवर युवक युवतींचे गट फिरत आहेत. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. 


खेळू द्या, पण नियम पाळा...
फ्लॅट संस्कृतीत कोंडलेली मुले मोकळ्या हवेत पुन्हा बागडताना दिसत आहेत. ही काहीशी आनंददायक  दिसत असली तरी या मुलांना सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर याचीही सवय लावणे गरजेचे आहे. नाहीतर या बागडणाऱ्या मुलांचे हसणे हरवण्याची  परिस्थिती येऊ शकते. तरी पालकांनी मुलांना खेळू द्यावे पण कोरोनाच्या मर्यादाही पाळाव्यात तरच हे खेळणे आनंददायी ठरेल.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT