कोल्हापूर

'श्री अंबाबाई'ची माहेश्वरी मातृका रूपात सालंकृत पूजा

आज दुसऱ्या दिवशी द्वितीय मातृका माहेश्वरी या रूपात पूजा बांधण्यात आली.

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर - नवरात्रत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची माहेश्वरी मातृका रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. यंदाच्या उत्सवात सप्तमातृका या संकल्पनेवर श्री अंबाबाईच्या सालंकृत पूजा बांधल्या जात आहेत. आज दुसऱ्या दिवशी द्वितीय मातृका माहेश्वरी या रूपात पूजा बांधण्यात आली. ही भगवान शंकराची शक्ती आहे. ती नंदीवर आरूढ असून तिला चार हात आणि त्रिनेत्र आहेत. तिच्या हातात त्रिशूल, डमरू, माळा, वाडगा आहेत, अशी माहिती श्रीपूजक अरुण मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, सकृत मुनीश्वर यांनी दिली.

दरम्यान मंदिरात यंदा ऑनलाईन बुकिंग करून भाविकांना दर्शन दिले जात असून शिवाजी चौकातूनच दर्शन रांगेत प्रवेश आहे. बुकींगचा मेसेज दाखवल्यानंतर थर्मल स्क्रिंनींग आणि सॅनिटायझेशन झाल्यानंतरच दर्शन रांगेत प्रवेश दिला जातो आहे. मुखदर्शनाची सोय महाव्दार येथे असून त्यासाठी बिनखांबी गणेश मंदिरापासून दर्शन रांग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण, ठाकरे गटाकडून खड्ड्यांमध्ये झाडं लावणार

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT