Ambabai Temple Vat Purnima 2023 esakal
कोल्हापूर

Kolhapur Vat Purnima : अंबाबाई मंदिरात वडाची पूजा करतानाच झाडाने घेतला पेट; घाबरुन महिलांची पळापळ

अंबाबाई मंदिरातील रामाचा पार येथील वडपूजनासाठी सुवासिनींनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

कापराची झळ वडाला गुंडाळलेल्या धाग्याला लागली. त्यामुळे धाग्याने पेट घेतला.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील (Ambabai Temple) रामाचा पार येथील वडपूजनासाठी महिलांनी सकाळपासूनच गर्दी केली. पूजा करताना लावलेल्या कापूर आणि अगरबत्तीमुळे वडाला गुंडाळलेल्या सुताने पेट घेतला.

आणि क्षणात अगदी पारंपरिक उत्साहात सुरू असलेल्या वटपौर्णिमेच्या (Vat Purnima 2023) सोहळ्यात महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिलांची तारांबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी, अंबाबाई मंदिरातील रामाचा पार येथील वडपूजनासाठी सुवासिनींनी सकाळपासूनच गर्दी केली होती. वडपुजनासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या. पूजा करताना महिलांनी वडाच्या बुंध्याच्या ठिकाणीच कापूर पेटवला. बऱ्याच महिलांकडून तेथे कापूर पेटवला गेला.

या कापराची झळ वडाला गुंडाळलेल्या धाग्याला लागली. त्यामुळे धाग्याने पेट घेतला. यानंतर मात्र मंदिर परिसरातील महिलांमध्ये एकच खळबळ उडाली. झाडाला लागलेली आग पाहताच मंदिर परिसरातील यंत्रणा सतर्क होत आग विझविण्यासाठी धावली. घटनेचे गांभीर्य ओळखून पूजन करत असलेल्या महिलांना तत्काळ तेथून खाली उतरवले.

या कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक मशीनच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे अंबाबाई मंदिर परिसरातील मोठा अनर्थ टळला. त्यानंतर मात्र कापूर आणि उदबत्ती इतर ठिकाणी लावण्याच्या सूचना देवस्थान समिती प्रशासनाकडून महिलांना देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: सून सासरच्यांचा सांभाळ करण्यास बांधील नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, वारसा हक्क आणि पोटगी वेगवेगळे

Pune Rain Update : पुण्यात अवकाळीची एन्ट्री; बाणेरमध्ये गारांचा पाऊस, उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा

Latest Marathi News Live Update : भारत सरकारकडे पुरेसा गॅस, इंधनसाठा उपलब्ध : छगन भुजबळ

Political Statement : नशेखोरांविरोधात रस्त्यावर उतरणार; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा इशारा

Ajinkya Rahane: KKR चे 25 कोटी पाण्यात ग्रीनच्या 'नो बॉलिंग'ने कोलकात्याचं गणित बिघडलं; रहाणेंचं उत्तर ऐकून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT