Ambabais Kheer Prasad will be delivered at home 
कोल्हापूर

अंबाबाईचा खीर प्रसाद मिळणार घरपोच 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : श्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे (धर्मशाळा) अश्विन पौर्णिमेस श्री अंबाबाई मंदिर परिसरात खीर, भात, आमटी आदी प्रसाद वाटप करण्यात येतो. ही परंपरा 66 वर्ष सुरू आहे. याचा लाभ भाविक घेत असतात; मात्र या वर्षी कोरोनामुळे अश्विन पौर्णिमेचा प्रसाद करून वाटप करता येणार नाही, अशा परिस्थितीत प्रसाद वाटपात खंड पडू नये, म्हणून श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने 51 रुपये आणि यापेक्षा अधिक रक्‍कम भरून नोंदणी केलेल्या पहिल्या एक हजार भाविकांना प्रातिनिधीक स्वरुपात देवीचा "खीर प्रसाद' घरपोच देण्याची व्यवस्था केली. 

FATAFAT या ऑनलाईन डिलिव्हरी ऍपच्या माध्यमातून प्रसाद देण्यात येणार आहे. इच्छुक भाविकांनी ऑनलाईन रक्कम भरून बुकिंग करावे. त्यानंतर दिलेल्या लिंक उघडून स्वत:चे संपूर्ण नाव, पोस्टल पत्ता, फोन नंबर, रक्कम भरलेल्या व्यवहाराचा स्क्रीन शॉट काढून फॉर्म भरून द्यायचा आहे. ही माहिती देणे आवश्‍यक आहे. ही योजना फक्त कोल्हापुरातील स्थानिक भाविकांपुरती मर्यादित आहे, अशी माहिती श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी दिली. केवळ भाविकांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रसाद वाटप होणार असल्याने निराशा टाळण्यासाठी लवकर नोंदणी करावी. प्रथम रक्कम जमा करणाऱ्या एक हजार भाविकांनाच हा महाप्रसाद पाठविला जाणार आहे.

ज्या भाविकांना गुगल पे किंवा फोन पे वर देणगी मूल्य देणे शक्‍य नसेल त्यांनी श्री महालक्ष्मी भक्त मंडळ (धर्मशाळा), ताराबाई रोड येथे नाव नोंदणी करून देणगीमूल्य देता येईल. नाव नोंदणीची अंतिम मुदत 29 ऑक्‍टोबर आहे. बुकिंग पेमेंट आणि संपर्कासाठी तन्मय राजू मेवेकरी (गुगल पे व फोन पे), फॉर्मसाठीची लिंक -https://forms.gle/FVCkZCgRAM2ginpG7 वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT