Ambedkar Jayanti 2020 Hindu kod bill babasaheb ambedkar 
कोल्हापूर

हिंदूंचा उत्कर्ष करणारे हिंदू कोड बिल 

डॉ. प्रमोद फरांदे

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व जातीधर्मातील लोकांसाठी कार्य केले आहे. बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील सर्व स्त्री-पुरुषांच्या उन्नतीसाठी केलेले काम विसरता येण्यासारखे नाही. असे असतानाही काही लोक बाबासाहेबांबाबत सतत गैरसमज पसरवीत असतात. बाबासाहेबांचा द्वेष करण्यापूर्वी त्यांनी हिंदूंसाठी काय केले आणि त्यामुळे हिंदूंच्या जीवनामध्ये कसा बदल झाला हे अभ्यासणे गरजेचे आहे.

हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांनी कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. "बाबासाहेबांनी मांडलेले बिल सरकारने जसेच्या तसे स्वीकारले असते तर हिंदू समाज अधिक उन्नत होऊन अंधश्रद्धा, कर्मकांडमुक्त झाला असता', असे प्र. के. अत्रे यांनी नमूद केलेले आहे. हिंदू कोड बिल अस्तित्वात येण्यापूर्वीचा पुरातन हिंदू कायदा हा शास्त्रसंमत नव्हता. हिंदू धर्म आणि शास्त्र यांचा कोणताही संबंध या कायद्यामध्ये नव्हता. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलात नव्या मतांना, आचार-विचारांना मान्यता दिली. त्यासाठी जुन्या शास्त्रांचा आधार घेतला. कायद्यात एकसूत्रीपणा आणला. कायदे निश्‍चित केले. कलमाबद्दल अगर तरतुदीबद्दल कोणतीही शंका, संदिग्धता ठेवली नाही. कायदा सर्व ठिकाणी सारखा ठेवला. आरोपी उच्च जातीतला म्हणून सौम्य शिक्षा आणि खालच्या जातीतला म्हणून कडक शिक्षा असा प्रकार न ठेवता सर्वांना कायदा समान हे तत्त्व स्वीकारून देशभर सुसूत्र कायदा आणला. हे झाले कायद्याचे वैशिष्ट्य. आता या कायद्यामुळे हिंदू धर्मातील लोकांच्या जीवनात काय बदल झाला हे थोडक्‍यात पाहूया. 

महत्त्वाचे बदल असे : 
1. विवाह : पुरातन हिंदू कायद्याप्रमाणे विवाह व दत्तक हा ज्या त्या जातीत होत असे. दुसऱ्या जातीत विवाह केल्यास अथवा दत्तक गेल्यास ते रद्द समजले जात असे. हिंदू कोड बिलामुळे जातीची बंधने नाहीशी होऊन कोणत्याही जातीत विवाह व दत्तक होतात. त्यामुळे हिंदू धर्मांतील जातीच्या भिंती कमी होण्यास मदत झाली. 

2. एकपत्नित्व : पुरातन हिंदू कायद्याप्रमाणे हिंदू हव्या तितक्‍या स्त्रियांशी विवाह करत असे. त्यामध्ये बंगालमध्ये कुलीन विवाह पद्धतीमध्ये एका व्यक्तीने 500 स्त्रियांशी विवाह केल्याची उदाहरणे आहेत. त्यामध्ये एक पुरुष इतक्‍या बायकांना सुखाने सांभाळू शकेल काय? ही भयंकर बहुपत्नित्वाची चाल हिंदू कोड बिलात बंद करण्यात आली. 

3. घटस्फोट : पुरातन कायद्याप्रमाणे बायको ही नवऱ्याची अर्धांगी समजली जाते. लग्न केले की दोघांनाही एकमेकाबरोबर पटत नसले तरी विभक्त होण्यास परवानगी नव्हती. नवरा-बायकोचे एकमेकाशी पटत नसतानाही एकत्रित ठेवण्याची सक्ती रास्त नसल्याने काही ठराविक अटींवर काडीमोड घेण्याची सवलत कोड बिलामध्ये ठेवण्यात आली. 

4. महिलांना हक्क : हिंदू कोड बिलामुळे महिलांना त्यांचे हक्क, अधिकार मिळाले. पुरातन कायद्याप्रमाणे स्त्रियांची संपत्तीवर संपूर्ण मालकी नव्हती. लग्नावेळी तिला जी रक्कम, दागिने दिले जात होते, तेच तिचे धन होते. विधवा महिलांचासुद्धा आपल्या पतीच्या मिळकतीवर हक्क नव्हता. हिंदू कोड बिलात हा भेदाभेद काढून स्त्रीला समान वाटा मिळाला. वडिलांच्या मिळकतीवर मुलाप्रमाणे मुलींनाही समान हक्क देण्यात आला. आधार तुटलेल्या महिलांना आधार देण्यात हा कायदा यशस्वी झाला. हा कायदा म्हणजे स्त्रियांच्या स्वातंत्र्य हक्काची सनद आहे. 

5. वारसा हक्क कायदा : वडिलार्जित इस्टेटीवरील हक्कासंबंधी राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धती होत्या. त्या रद्द करून एकच पद्धत आणण्यात आली. यामुळे सर्वत्र सुसंबद्धता व इस्टेटीचा योग-विनियोग करण्यास वडील मोकळे झाले. त्यामुळे संपन्नता व आर्थिक उत्पन्न वाढण्यात मदत झाली. 

अशा अनेक चांगल्या बाबी हिंदू कोड बिलामुळे झाल्याचे हे आपल्याला बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनातून पाहिल्यास लक्षात येईल. हा कायदा मंजूर करण्यासाठी बाबासाहेबांना मोठा संघर्ष करावा लागला. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्यासह अनेक प्रस्थापितांनी विरोध केल्याने तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना माघार घ्यावी लागली. पुढे टप्प्याटप्प्याने हा कायदा लागू करण्यात आला. बाबासाहेबांनी कामगार, शेतकरी, शेतमजूर, शेती, उद्योग, वीज, पाणी आदी क्षेत्रात केलेले काम आजचे सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी दिशादर्शक ठरतात 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT