And the crocodile of the villagers of Dugunwadi got loose kolhapur marathi news 
कोल्हापूर

कोल्हापुरी गड्यांचा नादच खुळा... विहिरीतून काढून थेट खांद्यावरच घेतलं मगरीला......

सकाळ वृत्तसेवा

दुगूनवाडी (कोल्हापूर)  ः येथील आप्पासाहेब पाटील यांच्या विहिरीतील मगर पकडण्यात अखेर आज यश आले. वन विभागाच्या वन्यप्राणी रेस्क्‍यू टीमने दुगूनवाडी-मुंगूरवाडी ग्रामस्थांच्या मदतीने ही मगर पकडली. त्यासाठी विहिरीतील सारे पाणी उपसण्यात आले होते. मगरीला पकडल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

येथील मुंगूरवाडीच्या ओढ्यात गेल्या दोन महिन्यापासून मगरीचा वावर होता. ग्रामस्थांना तिचे दर्शन घडत होते. त्यामुळे ग्रामस्थांत भितीचे वातावरण होते. दरम्यान, मंगळवारी (ता.3) ही मगर ओढ्याच्या काठी असणाऱ्या आप्पासाहेब पाटील यांच्या विहिरीत जाताना काही जणांनी पाहिले. त्याची कल्पना वन विभागाला देण्यात आली होती. वन विभागाने सतर्कता बाळगत ग्रामपंचायत, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थांच्या सहकार्याने रात्रभर प्रकाशाची व्यवस्था केली. इंजनाने विहिरीतील पाणी उपसण्यास सुरवात केली. सुमारे 15 ते 20 फूट पाणी उपसण्यात आले.

आज सकाळी कोल्हापूर येथील वन्यप्राणी रेस्क्‍यू टीम दुगुनवाडीत दाखल झाली. या टीमने ग्रामस्थांच्या सहकार्याने सकाळी साडेदहाला मगरीला पकडले. तिला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेतली. पकडलेली मगर सात ते आठ फूट लांब आहे. सुमारे 60 किलो वजन आहे. रेस्क्‍यु टीमचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी सदर मगरीची वैद्यकीय तपासणी केली. मगर तंदुरुस्त असल्याने तिला मानवी वस्तीपासून दूर नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. वन विभागामार्फत मगर कोल्हापूर येथे पाठविली आहे. 

कोल्हापूरचे उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ, आजऱ्याचे वनक्षेत्रपाल सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक कोरवी, वनरक्षक राजेंद्र नाईक, नागेश खोराटे, रणजित पाटील, रेस्क्‍यु टीमचे डॉ. संतोष वाळवेकर, प्रदीप सुतार आदीचा पथकात समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT