appearance of jotiba by mahesh kothare serials Raja Jotiba of Dakhhan 
कोल्हापूर

दख्खनचा राजा जोतिबाला महेश कोठारे यांनी घातले साकडे

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) :  दख्खनचा राजा जोतिबा हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान . ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत हजारोंच्या संख्येने भाविक दख्खनच्या राजाच्या दर्शनासाठी  येतात. गुलाल खोबऱ्याची उधळण करतात . वर्षाकाठी डोंगरावर  एक कोटीच्या आसपास भाविक येतात . याच ज्योतिबा देवाचे महात्म्य सांगणारी दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होत आहे. 


ही मालिका चांगली होऊ दे यासाठी आज मालिकेचे निर्माते  महेश कोठारे यांनी ज्योतिबा देवाचे पारंपारीक पध्दतीने दर्शन घेऊन देवाच्या चरणी साकडे घातले. ग्रामस्थ, पुजारी यांनी   कोठारे यांचे  स्वागत करून फेटा बांधून सत्कार केला. त्यांनी ग्रामस्थांशी मालिके संदर्भात संवाद साधला . ही मालिका पूर्णपणे अधुनिक तंत्रज्ञान वापरून केली असून  सर्व ग्रामस्थ पुजारी यांचे सहकार्य मिळावे असे सांगीतले .स्थानिक कलाकार यांच्या सोबत ही त्यांनी सविस्तर चर्चा केली . 


गेली कित्येक महिने  कोरोनामुळे अनेकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता आलेले नाही, मात्र आता या मालिकेच्या माध्यमातुन दर्शन घेता येणार आहे.निर्माते महेश कोठारे यांची दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका 23 ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील संपूर्ण शूटिंग कोल्हापूरमध्ये होणार आहे. जवळपास दीड महिन्यापासून सेटचं काम सुरु आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत दख्खनचा राजा ज्योतिबाच्या आयुष्यातील माहित नसलेले पैलु उघडणार असल्याची माहिती मिळाली आहे. मालिकेद्वारे मांडण्यात येणारा भव्य सेट, टीम व दिग्दर्शन संतोष फुटाणे यांच्या सरकार्याने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना नवी संधी मिळाली आहे


दरम्यान ,संशोधक आणि लेखक म्हणून परिचित असलेले डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे हे या मालिकेचे तज्ज्ञ सल्लागार आहेत. महाराष्ट्रातील लोकदैवते हा त्यांचा खास अभ्यासाचा विषय आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव  याचे या मालिकेसाठी मार्गदर्शन लाभत आहे. मालिकेच्या लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे असून अविनाश वाघमारे दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

संपादन - अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT