Are sugarcane farmers the enemy of PM? - Why did Minister Hasan Mushrif say that 
कोल्हापूर

ऊसकरी शेतकरी पंतप्रधानांचे वैरी आहेत काय? - मंत्री हसन मुश्रीफ असे का म्हणालेत

प्रतिनिधी

कोल्हापूर  : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या सवलतीच्या पॅकेजमध्ये ऊसकरी व बागायती शेतकऱ्यांची दखलच घेतलेली नाही. ऊसकरी व बागायती शेतकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे साता -जन्माचे वैरी आहेत काय? असा सवाल राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. केंद्र सरकारकडून ऊसकरी व बागायती शेतकरी सतत बेदखल होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ऊसकरी शेतकऱ्याबद्दल पंतप्रधान श्री. मोदी एक शब्दही उच्चारत नाहीत. एवढा दुजाभाव कशासाठी ? असा सवालही त्यांनी केला. केंद्रीय मंत्रिमंडळात काम करणारे महाराष्ट्रातीलच दिग्गज मंत्री नितिन गडकरी यांचेही तीन-चार मोठे साखर कारखाने आहेत. ते सुद्धा या प्रश्नाबद्दल ब्र काढत नाहीत, अशी खंतही श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
श्री. मुश्रीफ म्हणाले,"केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक कर्जाच्या पॅकेजमध्ये ऊसकरी शेतकऱ्याच्या कर्जफेडीची मुदत ही 30 जून असते. मात्र केंद्र सरकारने इतर पिकांसाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी 31 मार्च ही कर्ज परतफेडीची तारीख धरून त्याला मुदतवाढ दिलेली आहे. म्हणजेच ऊसकरी व बागायती शेतकऱ्यांच्या कर्जफेडीला मुदतवाढ दिली नाही. या पॅकेजमधील व्याजाच्या सवलतीत तर शेतकऱ्यांची चेष्टा केलेली आहे. 
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बॅंक एक लाखांपर्यंत पीक कर्जाला झिरो टक्के व्याज आणि तीन लाखापर्यंतच्या कर्जाला दोन टक्के व्याज आकारतो. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक दरवर्षी 32 कोटी रुपयांचा तोटा सहन करते व 1800 कोटी रुपयांचा पीक कर्ज पुरवठा करते.' 
आताही या सवलतीच्या पॅकेजमध्ये तीन टक्के आणि चार टक्के व्याजदर प्रामाणिकपणे भरणाऱ्या शेतकऱ्याला द्यायला निघाले आहेत. यावर श्री मुश्रीफ म्हणाले,"ही सवलत नवीन नाही, ती आधीपासून सुरूच आहे. कोरोनाच्या नावाखाली शेतकऱ्यांची चाललेली ही शुद्ध फसवणूकच आहे. आम्ही मुळातच त्याच्यापेक्षा जास्तच सवलत आधीपासूनच देत आहोत. त्यामुळे केंद्र सरकारच्या या फसव्या योजनेचा जिल्ह्याला काही उपयोग नाही.' 

केंद्राने या मागण्या पूर्ण कराव्यात. 
- साखरेचा दर क्विंटलला 3100 रुपयावरून 3500 रुपये करा 
- कारखान्यांची इतर कर्ज एनपीएमध्ये जाण्याची व एनपीएमध्ये गेलेल्यांची साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांना सरळ सात हप्ते द्या. 
- आमच्या हक्काचे बफर स्टॉकचे व्याज, साखर निर्यातीचे अनुदान आणि को-जन प्रकल्पांचे अनुदान वेळेवर द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT