arogya setu app contact a kolhapur commissioner take for you from corona in kolhapur
arogya setu app contact a kolhapur commissioner take for you from corona in kolhapur 
कोल्हापूर

तो कॉल आला आणि आयुक्त का झाले अवाक् ?

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आला आहात. काळजी घ्या, आवश्‍यक असल्यास क्वॉरंटाईन व्हा, असा सल्ला देणारा कॉल थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना आला आणि खुद्द आयुक्त कलशेट्टी अवाक्‌ झाले. कॉल करणाऱ्या व्यक्तीला कोणाला कॉल केला आहे याची माहिती नव्हती. संबंधित व्यक्ती कोण आहे हे माहिती नव्हते, मात्र कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कॉल करून त्याची कल्पना देणे ही एकच गोष्ट त्यांना माहिती होती. कारण हा कॉल करणारी व्यक्ती ‘आरोग्य सेतू ॲप’वरील होती.

‘आरोग्य सेतू’ शासकीय ॲप आहे. त्यामध्ये तुमचा मोबाइल नोंद केल्यास तुमच्या आजूबाजूच्या कोरोनाबाबतचे संदर्भ ते कॉल करून किंवा एसएमएसद्वारे देते. याच सेतू ॲपमध्ये आयुक्त कलशेट्टी यांचा मोबाइल क्रमांक नोंद आहे. आयुक्त कलशेट्टी यांनी प्रशासकीय व्यवस्था पाहण्यासाठी काही कोविड सेंटर आणि कोविड विभागांना भेटी दिल्या. त्यामध्ये काही पॉझिटिव्ह पत्रकारांच्या सोबतही त्यांनी ठरावीक अंतरावरून विचारपूस केली. आणि ते त्यांच्या कामात व्यस्त झाले.

मात्र अचानकच त्यांना कॉल आला. तुम्ही पॉझिटिव्हच्या संपर्कात आला आहे व इतर माहिती सांगण्यास सुरवात केली. कॉल करणारी व्यक्ती ही आरोग्य सेतू ॲपमधून बोलणारी होती. ‘आरोग्य सेतू ॲप’वरील यंत्रणा खरोखरच किती सक्रिय आणि योग्य आहे त्याचा अनुभव डॉ. कलशेट्टी यांनी घेतला. कोविड सेंटरची पाहणी करताना तेथील व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे कॉल आल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा कॉल झाल्यापासून आज आठ-दहा दिवस झाले. आयुक्तांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. 

"आरोग्य सेतू ॲपवरून कॉल आल्यामुळे त्यांचे काम योग्य असल्याचे दिसले. काही दिवसांपूर्वीचा हा कॉल आहे. माझी प्रकृती एकदम ठणठणीत आहे. केवळ प्रशासकीय कामाच्या निमित्ताने कोवीड सेंटरमध्ये गेल्यामुळे हा कॉल आला होता. कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यानंतर त्याची माहिती या ॲपद्वारे मिळते, त्यामुळे सर्वांनी आरोग्य सेतू ॲप डाऊन लोड करून घ्यावा."


- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT