कोल्हापूर

त्र्यंबोली यात्रांचा जल्लोष ; यंदा श्रावणाबरोबरच मोहरमचीही धूम

मंदिर दर्शनासाठी बंदच; वहिवाटदार पुजारी मंडळाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आषाढातील त्र्यंबोली यात्रांचा (Ashadhi Trimboli Yatra) जल्लोष आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. उद्या (मंगळवारी) बहुतांश पेठांमध्ये यात्रा होणार असून आज रात्रीपासूनच त्याच्या तयारीला प्रारंभ झाला. शुक्रवार (ता.६) आषाढातील अखेरचा शुक्रवार असून यादिवशी या यात्रांची सांगता होणार आहे.

दरम्यान, आषाढातील यापूर्वीच्या मंगळवार व शुक्रवारी घरगुती नैवेद्य अर्पण करण्यासाठी टेंबलाई टेकडीवर भाविकांनी गर्दी केली. पण, आता गल्ल्यांची यात्रा होणार असून अधिक गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिर दर्शनासाठी बंदच असून मोजक्याच भाविकांनी बाहेरून दर्शन व इतर विधी करावेत, असे आवाहन वहिवाटदार पुजारी मंडळाने केले आहे.

पेठांमध्ये यात्रा होणार असून आज रात्रीपासूनच त्याच्या तयारीला प्रारंभ झाला.

आषाढ सांगतेकडे निघाला असताना आता श्रावणाच्या अध्यात्मिक आनंदोत्सवाची चाहूल लागली आहे. यंदाच्या श्रावणात एकूण पाच सोमवार मिळणार असून शिव मंदिरे यंदा तरी दर्शनासाठी खुली होतील का, याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे. यंदा अधिक मासामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेला मोहरमचा सण एक महिना अगोदर आला आहे. यापूर्वी नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सवात मोहरमची धूम अनुभवायला मिळाली. यंदा मात्र श्रावणाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच मोहरमला प्रारंभ होणार आहे. शहरात अडीचशेहून अधिक ठिकाणी पंजे प्रतिष्ठापना होणार असून १८ ऑगस्टला खत्तलरात्र तर १९ ऑगस्टला पंजे विसर्जन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Latest Marathi News Live Update: व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीसाठी शासनाची मंजुरी

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

SCROLL FOR NEXT