कोल्हापूर

गोकुळ रणांगण; 'पाहुणचार केला म्हणजे पाठिंबा दिला असं नाही'

अशोक चराटी यांचा विरोधी आघाडीला धक्का

सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील मंत्री भेटायला आले. त्यांना चहा-पाणी देवून पाहुणचार केला म्हणजे त्यांना पाठिंबा दिला नाही, अशी स्पष्ट भूमिका जिल्हा बॅंकेचे संचालक अशोक चराटी यांनी आज घेतली. त्यांनी गोकुळमध्ये विरोधी पॅनेलला नव्हे तर आमदार पी.एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तारूढ पॅनेलला पाठिंबा जाहीर केल्याचे असल्याचे श्री. सराटी यांनी सांगितेल.

दोन दिवसापूर्वी जिल्हा बॅंकेचे संचालक व आजरा कारखान्याचे माजी चेअरमन अशोक चराटी यांनी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा दिल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केले होते. दरम्यान आज अशोक चराटी यांनी गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला पाठिंबा जाहीर करुन विरोधी आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

यावेळी चराटी म्हणाले, कोणत्याही निवडणूकीत लोक एकमेकांना भेटत असतात. नेते, उमेदवार घरी येतात. त्यामुळे घरी आलेल्या लोकांचा पाहुणचार केला जातो. आपल्या घरीही विरोधी आघाडीचे नेते आले होते. त्यांचा चहापान देवून पाहुणचार केला. याचा अर्थ त्यांना पाठिंबा दिला असे नाही. जिल्ह्याच्या आणि गोकुळच्या राजकारणात आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक हेच आपले नेते आहेत. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai–Pune Trains: मुंबई-पुणे मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द; मात्र 'या' दोन एक्स्प्रेस सुरू, पुणे रेल्वे स्थानकाकडून माहिती

Sanjay Raut letter to Chief Minister : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शालेय साहित्य खरेदीत ५५ कोटींचा घोटाळा?; संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Latest Marathi News Live Update : वीर धरणामधून निरा नदी पात्रामध्ये सुरू असणारा पाण्याचा विसर्ग वाढवणार

Pandharpur Politics: आषाढीपूर्वी पंढरपूर पालिकेच्या सभेत गोंधळ; अतिक्रमण कारवाईवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, नेमक काय घडलं..

Navi Mumbai Crime: ८ दिवसांत दीड कोटीला गंडा, १,००० हून अधिक सिम कार्ड्सचा वापर; २४ वर्षीय इंजिनिअरला अटक

SCROLL FOR NEXT