Asphalt on one side of the road, carved on the other 
कोल्हापूर

रस्त्याची एक बाजू डांबरी, दुसरी उकरलेली 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : प्रतिभानगरमधील जैन मंदिरासमोरील रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. हा रस्ता जलवाहिनीसाठी खोदला; पण नंतर पुन्हा नीट केला नाही. त्यामुळे रस्त्याची एक बाजूच खराब झाली आहे. यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून, वाहन चालकांना कसरत करतच वाहन चालवावे लागते. गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्याची ही दुरवस्था तशीच आहे. 

शिवाजी विद्यापीठाच्या पिछाडीस प्रतिभानगर हे मोठे उपनगर आहे. एका बाजूला कष्टकरी लोकांची छोटी घरे आणि दुसऱ्या बाजूला आलिशान बंगले असे चित्र इथे दिसते. या उपनगराच्या मधोमध एक छोटी बाग आहे. त्यासमोर जैन मंदिर आहे. मंदिरासमोरील रस्ता हा येथील मुख्य रस्ता आहे. विद्यापीठातून शहरात येणारी वाहने याच मार्गाने जातात. याशिवाय उद्यमनगर, वि. स. खांडेकर प्रशाला, सागर विद्यालय या शाळा आहेत. तेथील विद्यार्थी वाहतूकही याच मार्गाने होते. 

दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची वाहतूकही याच मार्गाने होते. सहा महिन्यांपूर्वी जलवाहिनीच्या कामासाठी या रस्त्याची एक बाजू खोदली होती. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची डागडुजी करून डांबरीकरण करणे आवश्‍यक होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे रस्त्याची एक बाजू डांबरी तर दुसरी बाजू उकरलेली अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झाली आहे. त्यामुळे मुळातच अरुंद असणाऱ्या या रस्त्याची रुंदी आणखी कमी झाली आहे. या रस्त्यावर वाहन घसरणे, ओव्हरटेक करताना होणारे अपघात यांचे प्रमाण वाढले आहे.

अपघात टाळण्यासाठी हा रस्ता नीट करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे घरही याच परिसरात आहे. महापालिकेतही त्यांच्याच पक्षाची सत्ता आहे. असे असले तरीही हा रस्ता सहा महिन्यांपासून अशाच दयनीय अवस्थेत आहे. 

दृष्टिक्षेप 
- प्रतिभा नगरात जलवाहिनीसाठी रस्ता खोदला 
- खोदाईमुळे रूंदी झाली कमी 
- सहा महिन्यांपासून जैसे थे स्थिती 
- अपघाताचे प्रमाण वाढले 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT