Shivaji University Kolhapur esakal
कोल्हापूर

Shivaji University चे नाव आणि बोधचिन्ह वापरून खोटे प्रमाणपत्र देण्याचा प्रकार; खेळाडू, पालकांची क्रीडा अधिविभागाकडे तक्रार

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील आणि संलग्नित एका महाविद्यालयातील संबंधित खेळाडू धावणे क्रीडा (Sports) प्रकारातील आहे.

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी येथे ७ ते १० मे दरम्यानच्या या स्पर्धेसाठी देखील नेले. त्यानंतर या स्पर्धेचे ८ जून रोजी प्रमाणपत्र येणार असल्याचे या प्रशिक्षकाकडून सांगण्यात आले.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे (Shivaji University Kolhapur) नाव आणि बोधचिन्ह वापरून मैदानी क्रीडा प्रकारातील खोटे प्रमाणपत्र (Fake Certificate) देण्याच्या प्रकाराची तक्रार एका खेळाडूच्या पालकांनी क्रीडा अधिविभागाकडे केली आहे. या प्रमाणपत्राची चौकशी, पडताळणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील आणि संलग्नित एका महाविद्यालयातील संबंधित खेळाडू धावणे क्रीडा (Sports) प्रकारातील आहे. या क्षेत्रातील खासगी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव सुरू आहे. नाशिक येथे या खेळाडूला स्पर्धेसाठी नेण्यात आले. तेथे त्याला गुवाहाटीमधील खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाल्याचे सांगण्यात आले.

गुवाहाटी येथे ७ ते १० मे दरम्यानच्या या स्पर्धेसाठी देखील नेले. त्यानंतर या स्पर्धेचे ८ जून रोजी प्रमाणपत्र येणार असल्याचे या प्रशिक्षकाकडून सांगण्यात आले. पुढे नाशिक येथे झालेल्या स्पर्धेचे प्रमाणपत्र शिवाजी विद्यापीठाचे प्रमाणपत्र म्हणून या खेळाडूला देण्यात आले. त्यावर विद्यापीठाचे नाव, बोधचिन्हाचा वापर करण्यात आला आहे.

त्याबाबतची लेखी माहिती या खेळाडू आणि त्याच्या पालकांनी आज विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाच्या संचालकांना दिली आहे. आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील दिली आहेत. संबंधित प्रशिक्षकाने दिलेल्या प्रमाणपत्राची विद्यापीठाने चौकशी करावी, अशी मागणी या खेळाडू आणि पालकांनी केली आहे.

प्रमाणपत्रावर उल्लेख असा

या खेळाडूला दिलेल्या प्रमाणपत्रावर बोर्ड ऑफ स्पोर्टस् अॅन्‍ड फिजिकल एज्युकेशन, झोनल स्पोर्टस्, चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्या स्वाक्षरी, सन २०२३-२४ यासह शिवाजी विद्यापीठाचे नाव, बोधचिन्हाचा उल्लेख आहे. स्पर्धा नाशिकमध्ये झाली असेल, तर तेथील विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे स्पर्धा नाशिकमधील आणि प्रमाणपत्र शिवाजी विद्यापीठाचे असा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाने यावर्षी खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राची डिझाईन बदलली आहे. त्यावर स्पर्धेचे ठिकाण, तारीख यांचा उल्लेख समाविष्ट केला आहे. त्यामुळे संबंधित खेळाडूला मिळालेले प्रमाणपत्र या स्वरूपातील नाही. त्यामुळे या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने चौकशी करणे आवश्यक आहे.

या स्वरूपातील विद्यापीठाचे खोटे प्रमाणपत्र दिल्याची तक्रार संबंधित खेळाडू, पालकांनी क्रीडा अधिविभागाकडे केली आहे. त्यांनी या प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला दिली आहे. याबाबत योग्य ती चौकशी केली जाईल.

-डॉ. शरद बनसोडे, संचालक, क्रीडा अधिविभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT