Sad Farmer 
कोल्हापूर

आटपाडी तालुक्यातील 102 शेतकऱ्यांवर कारवाई

थकबाकीदार शेतकऱ्यांवर कारवाई; शेतकऱ्यांशी संपर्क साधून तोडग्याची गरज

सदाशिव पुकळे

झरे (सांगली) : आटपाडी तालुक्यातील विकास सोसायटीकडून पिक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज १०२ शेतकऱ्यांकडे थकीत आहे. त्याची सरासरी २ कोटी ३० लाख ६३ हजार रुपये रक्कम होत असून वसुलीसाठी विकास सोसायटीमार्फत १०१ कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक थकबाकीदार सभासदाची सुनावणी सहायक निबंधक कार्यालयात सुरू आहे.

सततचा दुष्काळ, पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू असताना दुष्काळात अनेकांच्या द्राक्षबागा डाळिंब बागा पाण्याविना जळून गेल्या. मागील वर्षी मुबलक असा पाऊस पडला तोही नुकसान करून गेला. दुष्काळात लावलेल्या बागा वाया गेल्या, पिके वाया गेली, चाऱ्याअभावी जनावरे कसाबच्या दावणीला गेली. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने जगायचं कसं? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

शासनाने कर्जमाफी जाहीर केली परंतु त्यामध्ये अनेक जाचक अटी घातल्याने अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले. ज्या शेतकऱ्यांना दोन वेळचे खाणं मिळणेही मुश्कील झाले. अशा शेतकऱ्यांनी कर्ज भरायचे कसे? असा गंभीर प्रश्न बनला असताना सध्या विकास सोसायटीने मात्र वसुलीचा तगादा लावला असून थकबाकीदारांवर केली आहे. विकास सोसायटीने शेतकऱ्यांशी संपर्क साधून तोडगा काढण्याची गरज आहे.

आटपाडी तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. सध्या काही भागांमध्ये टेंभूचे पाणी आले आहे, म्हणजे सर्व तालुक्यांमध्ये टेंभूचे पाणी आले असे नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी अजूनही पाण्याची भीषण टंचाई आहे. या सर्व बाबीचा विचार करून विकास सोसायटीने थकबाकीदार कर्जदारांच्या वर कारवाई थांबून सामोपचाराने प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

आटपाडी तालुक्यांमध्ये १०२ शेतकऱ्यांवर १०१ कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्याकडे दोन कोटी ३० लाख ६३ हजार रुपये येणे बाकी आहे.

- बी. डी. मोहीते, सहायक निबंधक अधिकारी, आटपाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT