attack on boy in kolhapur 
कोल्हापूर

धक्कादायक : जमिनीच्या हद्दीवरून वाद; विळ्यानेच तोडली तरुणाची बोटे

सकाळ वृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : शेतातील हद्द आणि रस्त्याच्या वादावरून येथे आज झालेल्या मारहाणीत एकाने दुसऱ्या युवकावर विळ्याने हल्ला केला. यामध्ये विक्रम नाना डकरे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून दोन-तीन ठिकाणी वार लागल्याने त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

 काल या परिसरातच कुरुकली येथील शेताच्या व वैरणीच्या वादा वरूनच खुनाची घटना ताजी असतानाच आज येथे झालेला प्रकार चांगलाच चर्चेत आला आहे.

याबाबतची माहिती अशी, येथील विक्रम नाना डकरे (वय ३६) हे आज सकाळी नागेश्वर मंदीर परिसराकडील शेताकडे वैरणीसाठी गेले होते. तिथे आदेश संभाजी ढोकरे या दोघांच्यात जमीनीची हद्द व वैरणीवरुन वादावादी झाली. आदेशवर धावुन गेलेल्या विक्रमच्याच हातातील विळा काढुन घेत त्याच्या हातावर, पायावर व कमरेजवळ वार केले. यात विक्रम यांच्या हाताची दोन बोटे तुटली.

 त्यामुळे त्यांना उपचारासाठी १०८ अँम्ब्युलन्समधून कोल्हापुरला नेण्यात आले. याची शाहुपूरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. ढोकरे व डकरे यांच्यात वारंवार शेतजमीनीवरुन वाद होत असतात.

इथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुकली येथे कालच वैरणीच्या कारणावरून एका युवकाचा खून झाला. हे प्रकरण ताजे असतानाच येथेही दोन युवकांमध्ये त्याच कारणावरून वाद झाला. याची चर्चा परिसरात सुरू आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT