Attempts To Abolish Oppressive Conditions In Minority Scholarships Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

शिष्यवृत्तीतील जाचक अटीं रद्द करण्यासाठी मंत्री सरसावले 

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : अल्पसंख्याक शिष्यवृत्तीच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागाचे राज्याचे संचालक सुनील चौहान यांच्याकडे केली आहे. या नव्या अटींबाबत शिक्षक व पालकांना होणारा त्रास याबाबतचा लेखी अहवाल पत्रासोबत जोडून मंत्री मुश्रीफ यांनी हे निवेदन सादर केले आहे.

"सकाळ'मध्ये "अल्पसंख्याक शिष्यवृत्तीच्या नवीन अटी त्रासदायक' या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन मंत्री मुश्रीफ यांनी अल्पसंख्याक शिष्यवृत्तीतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली आहे. शासनाने अल्पसंख्याक शिष्यवृत्तीमध्ये बदल करून नव्या अटी समाविष्ट केल्या. अचानकपणे मोठ्या प्रमाणात या नव्या अटी अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकांना डोकेदुखी ठरत होत्या.

शिष्यवृत्तीच्या मिळणाऱ्या रकमेपेक्षा लागणाऱ्या कागदपत्रांसाठीच खर्च जास्त येत होता. यामुळे पालकांनाही त्रास वाढला. परिणामी शिष्यवृत्तीकडे पालकांनी पाठ फिरवत उदासीनता दाखवली. याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीमुळे शिक्षक संघटनांनी ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली. तत्काळ मुश्रीफ यांनी अल्पसंख्याक शिष्यवृत्तीमधील जाचक अटी रद्द करण्याबाबत अल्पसंख्याक विभागाचे राज्य संचालक सुनील चौहान यांच्याकडे लेखी पत्रासमवेत निवेदन दिले आणि या जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सख्खे भाऊ, सख्खे व्याही! पाकच्या लष्करप्रमुखांनी लेकीचं लग्न भावाच्या मुलाशी लावून दिलं, लष्कराच्या मुख्यालयात लग्नसोहळा

Kolhapur Political News : घराणेशाहीला विरोध करणाऱ्या महायुतीकडूनच नेत्यांच्या वारसांना प्राधान्य, कोल्हापूरकरांची भूमिका काय?

Latest Marathi News Update : संभाजीनगरमध्ये भाजपच्या उमेदवारीवरून नाराजी, दोन महिला पदाधिकाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

Gold Silver Price Today : वर्षाच्या शेवटी सोने, चांदीचा दरात घसरण होणार!, चांदी वाढली सोने दरात घट...

Bhandup BEST Accident : भाजी कोणती आणू? पतीनं फोनवरून विचारलं, पत्नीचं उत्तर ऐकण्याआधीच गेला जीव

SCROLL FOR NEXT