Attention To The Role Of MLA Awade In Ichalkaranji Municipality Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजी पालिकेत आमदार आवाडे यांच्या भूमिकेकडे लक्ष

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : येथील पालिकेच्या विषय समित्यांच्या नूतन सभापती पदांच्या निवडी येत्या बुधवारी (ता.6) होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचालींना गती येत आहे. पालिकेतील विद्यमान सत्ता कायम ठेवायची की त्यामध्ये फेरबदल करायचा, हे सर्वस्वी आमदार प्रकाश आवाडे यांच्या भूमिकेवर ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. 

सध्या पालिकेत माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार प्रकाश आवाडे व राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे यांची संयुक्त सत्ता आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यपद व आरोग्य समिती भाजपकडे आहे. बांधकाम व शिक्षण समिती आवाडे गटाकडे तर पाणी पुरवठा तसेच महिला व बालकल्याण समिती कारंडे गटाकडे आहे. हीच सत्ता कायम राहिल्यास फक्त आवाडे व कारंडे गटातील समित्यांमध्ये अदलाबदल होणार आहे. 

मात्र विद्यमान सभागृहातील या शेवटच्या निवडी असणार आहेत. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहेत. गेल्या निवडीवेळी सत्तेतून बाहेर पडलेल्या ताराराणी आघाडीला सत्तेचे वेध लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत सत्तेत जाण्यासाठी या आघाडीने व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे सत्तारुढ गटामध्ये अस्वस्थता आहे. सत्ता कायम ठेवायची की फेरबदल करायचा, याबाबत आवाडे गटामध्ये मतभेद असल्याचे समजते. यावर त्यांच्यामध्ये विचारमंथन सुरु असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरच संभाव्य राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. 

सत्तेतील कारंडे गटातून दूर ठेवण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत असल्याचे सध्या सुरु असलेल्या चर्चेतून पुढे येत आहे. त्यामुळे कारंडे गट सावध झाला असून आतापासून या गटाने सत्ता कायम ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपकडे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही वजनदार पदे आहेत. त्यामुळे संभाव्य घडामोडीबाबत भाजपमधून या निवडीबाबत फारशी उत्सुकता दिसत नाही. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्या घडामोडी होणार याबाबत सद्या तरी अनिश्‍चितता आहे. 

दोन समित्यांच्या निवडीवर लक्ष 
सध्या पाणी पुरवठा आणि आरोग्य या दोन समितीच्या सभापती निवडीकडे जास्त लक्ष असणार आहे. यातील किमान एक समिती ताब्यात घेण्यासाठी विरोधकांनी आतापासूनच यंत्रणा कामाला लावली आहे. आरोग्य समितीच्या गत निवडीवेळी विरोधकांनी सत्तारुढ गटाला घाम फोडला होता. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT