The average person consumes two cups of tea daily 
कोल्हापूर

सरासरी एकव्यक्ती रोज घेतो दोन कप चहा

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर, ः भारतात प्रत्येक व्यक्तीकडून दिवसांतून कमान दोन कप चहा घेतला जातो. त्यामुळेच कोल्हापूरसह राज्यभर चहाचे वेगवेगळे ब्रॅण्ड आता पावलोपावली दिसू लागले आहेत. भारतात प्रती माणसी दररोज 80 मिलिमीटर चहा प्यायला जातो. एक कप चहा साधारण 40 मिलिमीटरचा मानला जातो. एका सर्व्हेतूनच शहरासह जिल्ह्यातील चहाची माहिती पुढे आली आहे. रोज दोन कप घेतला जातो. त्यापैकी तीस टक्के चहा हा ऑफिस आणि इतर ठिकाणी घेतला जातो तर 70 टक्के चहा घरीच प्यायला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. 
घरी पाहुणा आला की चहा, मीटिंगला चहा, मित्र भेटले की चहा पहाटेपासून रात्री मध्यरात्रीपर्यंत केव्हाही घेता येतो, तो चहा. जागरण करायचे असले तरीही चहा लागतोच. येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात तर रात्रभर चहाला उकळी येत असते. थकवा घालविण्यासाठीही चहाची गरज भासते. यामुळेच चहाची मागणी, ब्रॅण्ड आणि उत्पादन हा उत्सुकतेची बाब बनली. देशात चहासाठी "टी बोर्ड' ची स्थापना केली आहे. देशातील चहाचे उत्पादन, त्याची मागणी, पुरवठा या सर्वांवर त्याची बारीक नजर असते. "टी बोर्ड'च्या आकडेवारीनुसार मागील वर्षी भारतात 1 हजार 340 दशलक्ष किलो चहा तयार झाला. तर 1 हजार 90 दशलक्ष किलो चहाचा खप झाला आहे. केवळ भारतातून अडीचशे दशलक्ष चहाची निर्यात झाली. प्रती माणसी दररोज 80 मिलिलिटर चहा प्यायला जात असल्याची माहिती पुढे आली. 
आज बाजारात अनेक चहांच्या फ्रॅन्चाइजचे फलक ठिकठिकाणी दिसत आहेत. या व्यतिरिक्त ही कोल्हापुरात बासुंदीसह इतर प्रकारचेही चहाची चलती आहे. अनेकांनी आपली खासियत तयार करून ग्राहकांच्या पसंदीला उतरले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील खवय्यांची चहा पिण्याची ठिकाणे ठरलेली आहेत. पाच रुपयांपासून पंचवीस रुपयांपर्यंत चहाचा एक कप मिळत आहे. 

डस्टला मागणी 
डस्ट पावडर व गोळी असे चहाचे मुख्य प्रकार आहेत. कोल्हापूर भागात मुख्यतः डस्ट चहा वापरला जातो. कोल्हापूर परिसरात चहासाठी लागणारे दूध व साखर मुबलक व चांगल्या प्रतीचे मिळत असल्याने चहाची चवसुध्दा चांगली होते. त्यातील अँटी ऑक्‍सिडंटमुळे शरीराला फायदा होत असल्याचे तज्ज्ञांनी कडून सांगण्यात येते. 

कोल्हापुरी दूध भारीच 
कोल्हापुरातील दुधात फॅट अधिक असते. त्यामुळे चहा अधिक घट्ट होतो. त्यामुळे कोल्हापुरातील दूध इतर ठिकाणी चहासाठी वापरण्याची मागणी विक्रेत्यांकडे होत आहे. इतर ठिकाणचे दूध चहामध्ये घातल्यास तो घट्ट होत नसल्याचा अनुभव विक्रेत्यांचा आहे. परिणामी अनेक चहा विक्रेते हे कोल्हापुरातील दुधाला पसंती देतात.

संपादन - यशवंत केसकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT