Awareness of Kolhapur District Administration "Kutan B Thuktos Marda, Korona Karel Samadyancha Khurda" 
कोल्हापूर

"कुटं बी थुकतोस मर्दा, कोरोना करेल समद्यांचा खुर्दा' कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची जनजागृती

मतीन शेख

कोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी थुंकत सामाजिक आरोग्य धोक्‍यात आणणाऱ्या व्यक्तींवर प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा बगडा उचलला आहे. थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबत त्यांचे प्रबोधनही करण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनान विशेष प्रयत्न करत आहे. 
लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यासह शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली. लोक बाहेर पडल्याने समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला. यातच धूम्रपान करत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची संख्याही वाढली. ही घातक कृती टाळण्याच्या बद्दल प्रशासनाच्या सूचनेकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. याकडे "सकाळ'ने ग्राऊंड रिपोर्ट करत "पिचकारी नव्हे, तर कोरोनाचे स्फोटकच' या शीर्षकाखाली प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. प्रशासन सध्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईसह विविध माध्यमांतून त्यांचे प्रबोधन करत आहेत. 

सोशल मीडियाद्वारे प्रबोधन 
"कुटंबी थुकतोस मर्दा, कोरोना करेल समद्यांचा खुर्दा'... "का म्हणून थुंकायचं? स्वतःसोबत दुसऱ्याचे आरोग्य धोक्‍यात आणायचं... असे मार्मिक संदेश तयार करून फेसबुक, हॉट्‌स ऍप या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाकडून व्हायरल करत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत "ऍन्टी स्पीट मुहमेंट' सुरू करत रस्त्यांत थुंकणाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळ उभा केली आहे. त्याद्वारे ही लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

नागरिक झाले सजग 
रस्त्यावर थुंकणे हे कोरोनाच्या समूह संसर्गाला आमंत्रण ठरू शकते, हे समजल्यानंतर रस्त्यावर, सिग्नल चौकात थुंकण्याचे प्रकार कमी झाले आहेत. अनेक जण दंडात्मक कारवाईच्या भीतीने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचा धसका घेतला आहे. 
तसेच रात्रीच्या वेळी चौकातल्या कट्टयावर बसून मावा, गुटखा खात थुंकणाऱ्या टोळक्‍यांवर कारवाईची गरज आहे. 

असे आहे कारवाईचे पथक 
-शहरात एकूण 5 पथके कार्यरत 
-3 महापालिका अधिकाऱ्यासह 1 पोलिस कर्मचारी 
-शहर वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना कारवाईचे अधिकार 


35 लाखाचा दंड वसूल... 
सोशल डिस्टंन्स न पाळणे, मास्क न घालणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, तसेच नियमांचे उल्लघंन करत दुकाने, हॉटेल सुरु ठेवणे या कारणांसाठी महापालिका प्रशासनाने 35 लाखांचा दंड वसूल केला आहे. 

- संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: १७ तारीख उजाडली, पण लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे नाहीत… नेमका अडथळा कुठे? मोठी अपडेट समोर

Manikrao Kokate Resignation : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब? अजित पवार–फडणवीस भेटीने खळबळ

Viral Video: दिवस-रात्र मेहनत, पण कमाई फक्त 15 रुपये! ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयचा इमोशनल व्हिडिओ चर्चेत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील रितेशचा फस्ट लूक समोर, वाढदिवसादिवशी पोस्ट करत म्हणाला, 'क्षणभर थांबलेला सूर्य आणि...'

Ind vs SA 4th T20 : मालिका विजयासाठी भारताला विजय आवश्यक; सॅमसनला आज तरी मिळेल का संधी? कशी असेल प्लेईंग XI?

SCROLL FOR NEXT