Band in Ganeshotsav; The question of subsistence of artists with instruments 
कोल्हापूर

गणेशोत्सवात बॅंड पथक ; वाजंत्रीसह कलाकारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न

नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर  : वर्षानुवर्षे गणेश मिरवणुकांत ड्रम, ट्रम्पेट, सेक्‍सोफोन अशा सूरतालांची मोहिनी घालणाऱ्या बॅंण्डपथकांचा रोजगाराचा घास यंदा सलग दुसऱ्या वर्षी हिरावला आहे. मागील वर्षी महापूर आणि यंदा कोरोनाच्या संकटाने उत्सवातील दिमाखाचा सूर हरवला आणि बॅंण्डपथकातील एकेकाच्या जगण्याला जणू तडे गेले आहेत. गणेशोत्सवात दिवसभरात दीड दोन लाखांची कमाई करणारी ही पथके हवालदिल आहेत. 
गणेशोत्सवात वाद्यांच्या गजरात गणरायाचे आगमन ठरलेले. बॅंण्डपथकांच्या सुरेल वादनात बाप्पाला घरी नेले जाते. मंडळाच्या गणेशमूर्ती तर वाद्यांशिवाय नेता येत नाहीत. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आगमन व विसर्जन मिरवणूक रद्द झाल्या. यंदा गणेशोत्सव आणि बॅंण्डपथके या समीकरणाला खीळ बसली. साधारणतः गणेशोत्सवापासूनच बॅंण्डपथकांचे व्यावसायिक वर्ष सुरू होते, मात्र बॅंड पथकांची कमाईची मुख्य भिस्त ही गणेशोत्सवासोबत लग्नसराईवरही अवलंबून असते. यंदा नेमकी लग्नसराई व गणेशोत्सवातील "सिझन'च कोरोना आणि लॉकडाउनमुळे बुडाला आहे. 
शहरात सुमारे वीसहून अधिक बॅंड पथके आहेत. एका बॅंड पथकात सरासरी वीस ते पंचवीस वाजंत्री क्‍लोरोनेट, ट्रम्पेंट, इफोनियम, ढोल, ताशा, ड्रम, खंजिरी, ऑक्‍टोपॅड, सिंथेसायझर, सोक्‍सोफोन आदी वाद्य वाजविणाऱ्या कलावंतासोबत बॅंडमालक वर्षभराचा करार करतात. त्यानुसार वादकाला ठराविक रक्कम पगार म्हणून दिला जातो. गरज भासल्यास काही बॅंड पथके वादकांना तासावर मानधन देऊनही बोलावतात. या वादकांच्या जोरावर बॅंडमालक वादनाच्या सुपाऱ्या घेतात. सिझनमध्ये कमाई न झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे घडशी समाजाने किमान पाच जणांच्या उपस्थितीत बॅंण्डवादनाची परवानगी मागितली आहे. 


यंदा लग्नसराईच्या सर्व ऑडर्स रद्द झाल्या. निदान गणेशोत्सवात तरी काम मिळेल, अशी आशा होती. कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत गेल्याने गणेशोत्सवातही वाजवता आले नाही. आता घरखर्च कसा चालवायचा, हा प्रश्‍न आहे. 
- महेश कदम, सुप्रभात डिजिटल बॅण्ड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT