bank Election
bank Election Esakal
कोल्हापूर

Bank : प्रचाराचा उडणार धुरळा; विरोधकांचा कोल्हापुरात प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Bank Election )दोन्ही पॅनेलची घोषणा झाल्यानंतर आता प्रचाराच्या निमित्ताने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धुरळा उडण्यास सुरूवात झाली आहे. उमेदवारी निश्‍चित असलेल्या उमेदवारांनी यापुर्वीच प्रचार सुरू केला आहे. पॅनेलचा म्हणून सत्तारूढ गटाचा प्रचार शुभारंभ शनिवारी (ता. २५) गडहिंग्लजमध्ये तर विरोधकांचा प्रारंभ रविवारी (ता. २६) कोल्हापुरातील (Kolhapur )धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात होणार आहे.

या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. सत्तारूढ गटाच्या प्रचार शुभारंभाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, (Hasan Mushrif) पालकमंत्री सतेज पाटील,(Satej Patil) राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,(Rajendra Patil-Yadravkar) आमदार विनय कोरे,(Vinay Kore) प्रकाश आवाडे, (Prakash Aawade)पी. एन. पाटील (P.N.Patil) अशी दिग्गज मंडळी उपस्थित रहाणार आहेत. गडहिंग्लज (Gadhinglaj) येथील सभागृहात सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे. त्याच्या नियोजनाचीही जोरदार तयारी सुरू आहे.

सत्ताधाऱ्यांनी जागांचा प्रस्ताव नाकारलेल्या शिवसेनेने (Shivsena)त्यांच्यापासून फारकत घेत नव्या पॅनेलचीच थेट घोषणा केली. या पॅनेलमध्ये शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय गटाला सोबत घेतले आहे. या पॅनेलचा प्रचार शुभारंभ रविवारी (ता. २६) ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजता होणार आहे. या मेळाव्याल सेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरूडकर आदि उपस्थित रहाणार आहेत. माजी आमदार नरके यांच्या घरी २४ डिसेंबरला लग्नकार्य आहे, त्यासाठी येणारे शिवसेनेचे राज्य पातळीवरील नेतेही या प्रचार शुभारंभाला उपस्थित रहाण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT