bat released after three day 
कोल्हापूर

अखेर तीन दिवसानंतर झाली त्याची सुटका

संदीपखांडेकर

आर. के. नगर (कोल्हापूर) : जवाहरनगर शालीमार लॉनच्या परिसरातील झाडावर नायलॉनच्या दोऱ्यात अडकलेल्या वटवाघुळाची तीन दिवसानंतर सुटका झाली. अग्निशमल दलाच्या जवानांसह प्राणीमित्र प्रशांत साठे यांनी त्याला जीवदान दिले. 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने मुलांचा पतंग उडविण्याकडे कल वाढला आहे. कटाकटीसाठी मांजा दोऱ्याचा वापर त्यांच्याकडून होत आहे.

काही मुले थेट नायलॉनच्या दोऱ्याचाही वापर करत आहेत. या दोऱ्यात वटवाघुळ झाडाच्या शेंड्यावर अडकले होते. झाडावर वटवाघुळ उलटे लटकत असल्याने त्याची सहजासहजी कोणाला कल्पना आली नाही. परिसरातील एका नागरिकाला ते दोऱ्यात अडकल्याचे लक्षात आले. त्याने तत्काळ प्राणीमित्र साठे व मार्क गर्दे यांना बोलावले. मात्र, झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन त्याची सुटका करणे शक्‍य नसल्याने त्यांनी शास्त्रीनगरमधील अग्निशमन दलाच्या जवानांशी संपर्क साधला.

चालक अशोक साठे, राजेंद्र भोसले-तांडेल, फायरमन महेश साळोखे तत्काळ तेथे पोचले. त्यांनी शिडी लावून वटवाघुळाची सुटका केली. त्याच्या पायात दोऱ्याचा गुंता तयार झाल्याने साठे यांनी चाकूने तो कापून काढला. तीन दिवस झाडावर लटकल्याने ते अशक्त झाले होते. त्याला सर्पमित्र गणेश कदम यांच्याकडे दिले होते. त्यांनी त्याच्यावर औषधोपचार करून सोडून दिले. "मुलांनी पतंग उडविण्याची हौस पूर्ण करताना पक्ष्यांना जीव गमवावा लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. पतंग उडविण्यासाठी मांजा व नायलॉनच्या दोऱ्याचा वापर करू नये,' असे आवाहन साठे यांनी केले आहे. 

संपादन - अर्चना बनगे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT