be careful you eating for meshroom 
कोल्हापूर

तुम्ही आळंबी खाताय का?...खात असाल तर जरा जपूनच...

अमोल सावंत

कोल्हापूर : दरवर्षी पावसाळा आला की, परिसरात विविध रंगांची आळंबी उगवतात. काही आळंबी अन्नात उपयोगाला येतात, तर काही आळंबी घातक विषारी असतात. दरवर्षी आळंबी खाऊन विषबाधा होणाऱ्या अनेकजण असतात. यापैकी काही व्यक्तीत विषाचा असर कमी होतो, तर काही व्यक्तींना असर अधिक वाढतो. अनेकदा विषारी आळंबी खाल्ल्याने मृत्यूही होतो. म्हणून परिसरात, शेतात, शिवारात, जंगलात कुठेही फिरायला गेल्यानंतर कुठलेही आळंबे दिसले तर ते खाऊ नका. ज्यांना आळंबीची माहिती आहे, त्यांना विचारून मगच आळंबी खा, विषारी अन्‌ बिनविषारी अशा आळंबीच्या प्रजाती आहेत. ही आळंबी रात्री उगवते आणि सकाळी कोमेजून पडते. आळंबीच्या टोपीखाली किटक, किडे असतात. दुपारपर्यंत हे आळंबी पूर्णपणे नासते.

बेंदूर झाला की, अशी खाण्यायोग्य आळंबी घेऊन कपिलतीर्थ मार्केट, महाद्वार रोड, पापाची तिकटी, मिरजकर तिकटी आदी ठिकाणी शेतकरी येतात. खाण्याचे आळंबी पांढऱ्या रंगाचे अन्‌ टोपीवर चॉकलेटी रंग असतो. हे आळंबी अन्नासाठी वापरतात. आळंबी आणण्यासाठी पहाटे शेतात, जंगलात जावे लागते. जिथे सेंद्रिय पदार्थ भरपूर असतात. तिथेच ही आळंबी उगवतात. 

घातक आळंबी

जगातील ७०/८० आळंबीच्या प्रजाती घातक आहेत. यापैकी अमानिटा फॅलाईडस्‌ (डेथ कॅप), कोनोसाईब फिलारीस, कॉर्टिनारियस्‌ (वेब कॅप), गॅलेरियाना मार्जिनाटा (ऑटमन स्कलकॅप), ॲमानिटा (डिस्ट्रॉईंग एंजल्स्‌), पोडोस्ट्रोमा कॉन्यूॅडॅमेई, लॅपिएटा ब्रुनेएइनकार्नेटा (डेडली डॅपरलिंग) या अतिघातक प्रजाती आहेत. विशेषत: या सर्व प्रजाती परिसरात अन्‌ पश्‍चिम घाटात आढळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT