be no arrival and immersion processions at Ganeshotsav in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरकरांनो... यंदा बप्पाच्या मिरवणुका नाहीत अन देखावेही नाहीत...

सकाळवृत्तसेवा


कोल्हापूर - गणेशोत्सवातील आमगन आणि विसर्जन मिरवणूकच असणार नाहीत, त्यामुळे गणेश मंडळांनी परिस्थितीचे भान ठेवून पोलिसांना सहकार्य करावे. राज्य शासनाकडून येणाऱ्या नियमांचे पालन करावे, हीच पोलिसांची भूमिका आहे, गणेशोत्सव मंडळ आणि पोलिसांतील समन्वयासाठी पोलिस उपअधीक्षकांकडून लवकरच बैठकांचे आयोजन केले जाईल, असेही विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांनी त्यांची मते काल ‘सकाळ’कडे ‘सिटिझिन एडिटर’च्या माध्यमातून नोंदविली. त्याबाबत आज विशेष पोलिस महानिरीक्षक वारके यांच्याशी संवाद साधला. मंडळांच्या प्रमुखांचे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोचविले.

यावेळी श्री. वारके म्हणाले, ‘‘गणेशोत्सवाबाबतचा ग्राऊंड रिपोर्ट शासनाकडे पाठविला आहे. गणेशमूर्तींची उंची, देखावे, मिरवणुका याचा ठोस निर्णय राज्य शासन घेईल. त्यानंतर त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांकडून होईल.मात्र ‘ग्राऊंड रिपोर्ट’वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोरोनाच्या महामारीतून आपण जात आहोत. त्यामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव करावा, असे पोलिसांचे आवाहन आहे. पोलिसांकडून मंडळांना दिलेल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन सर्वांच्या हितासाठी आहे. त्याचा गैरअर्थ कोणी काढू नये. वाहतुकीस अडथळा होणार नाही, असे मंडप असावेत, अशी भूमिका गेल्यावर्षीही घेतली होती. आता ती कायम आहे. तसेच कोरोनाच्या महामारीत राज्य शासनाकडून जे आदेश येतील, त्याचे तंतोतंत पालन करावेच लागेल. त्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत.’’

गणेशोत्सवात नेमके नियम काय असतील? याबाबत अद्यापही मंडळांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत, याबाबत श्री. वारके म्हणाले,‘‘आगमन आणि विसर्जन मिरवणूक असणार नाही. तसेच देखावेही होणार नाहीत, असे असेल तर यंदा मंडळांनीही साधेपणाने, छोटी मूर्ती घेऊन गणेशोत्सव साधेपाणाने करावा, अशी भूमिका आहे. राज्य शासनाने यात काही बदल केल्यास त्या पद्धतीने मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात आहेत. पोलिस जनतेच्या भल्यासाठीच निर्णय घेत आहेत. याचाही विचार मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव साजरा करताना करावा, एवढीच अपेक्षा आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

SCROLL FOR NEXT