Municipal Corporation meeting  sakal
कोल्हापूर

Belgaum Corporation Recruitment : बेळगाव महापालिकेत लवकरच शंभर सफाई कामगारांची भरती; अशोक दुडगुंटी

Govt Job opportunity : महापालिकेतील आयुक्त कक्षात बुधवारी सफाई कामगार हितरक्षण समितीची बैठक पार पडली.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : महापालिकेतील शंभर सफाई कामगारांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. जानेवारी महिन्यात नियुक्त करण्यात आलेल्या १५४ सफाई कामगारांचे वेतन तातडीने आदा केले जाईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी बुधवारी दिली.

महापालिकेतील आयुक्त कक्षात बुधवारी सफाई कामगार हितरक्षण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत १५४ सफाई कामगारांच्या वेतनाचा मुद्दा गाजला.

सहा महिने झाले तरी त्या कामगारांना वेतन मिळाले नसल्याचा मुद्दा हितरक्षण समितीकडून उपस्थित करण्यात आला. सिंधुत्व प्रमाणपत्रामुळे वेतन देण्यात समस्या आल्याचे प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी सांगितले.

परंतु, ते सफाई कामगार महापालिकेकडे सहा महिने सेवा बजावत आहेत. त्यांना महापालिकेचे नियमित वेतन देता आलेले नाही; तरी कंत्राटी सफाई कामगारांना दिले जाणारे वेतन त्यांना दिले जावे. सिंधुत्व प्रमाणपत्राची समस्या दूर झाल्यावर नियमित वेतन फरक रकमेसह दिले जावे, अशी मागणी करण्यात आली. ती मागणी आयुक्तांकडून मान्य करण्यात आली.

महापालिकेत दुसऱ्या टप्प्यात १०० तर तिसऱ्या टप्प्यात १३४ सफाई कामगारांची भरती केली जाणार आहे. यापैकी १०० सफाई कामगारांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्या १०० जणांची निवड यादी लवकरच जाहीर केली जाईल, असे आयुक्त दुडगुंटी यांनी सांगितले. त्यानंतर १३४ सफाई कामगारांची भरती प्रक्रिया सुरू होईल, असेही ते म्हणाले.

महापालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचारी अभिषेक कंग्राळकर याची चौकशी करण्याची मागणी पुन्हा बैठकीत करण्यात आली. याआधीही हितरक्षण समितीकडून चौकशीची मागणी करण्यात आली होती; परंतु, ती पूर्ण झाली नव्हती.

बुधवारी बैठकीत पुन्हा मागणी करण्यात आली. सफाई कामगारांना घर द्यावे की भूखंड याबाबतचा निर्णय नगरविकास खात्याकडे प्रलंबित आहे. त्यासंदर्भात नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करण्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय बैठकीत झाला. ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’ संदर्भात संयुक्त सर्वेक्षण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत झाला होता.

त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले. सहाय्यक पोलिस आयुक्त कट्टीमनी, समाजकल्याण खात्याचे उपसंचालक प्रवीण शिंत्रे, सहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी, हितरक्षण समितीचे कार्यवाह विजय निरगट्टी, मुनिस्वामी भंडारी, षण्मुख आदियांद्र आदी बैठकीला उपस्थित होते.

स्वच्छतागृहांचा ठेका सफाई कामगारांना

आनंदवाडी येथील सफाई कामगार वसाहतीमध्ये व्यायामशाळा व ग्रंथालय बांधण्याबाबत कृती आराखडा तयार करण्याची सूचना आयुक्तांनी दिली. शहरातील स्वच्छतागृहांचा ठेका सफाई कामगारांना देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

हितरक्षण समितीला महापालिकेच्या जुन्या इमारतीत जागा देणे, आनंदवाडी येथे वाल्मिकी भवन बांधणे, महेश माळगी या कामगाराला नियमानुसार बढती देण्याचा निर्णयही बैठकीत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: आई गरुडाने चुकून दिला अंड्यावर पाय, रात्रभर होती दुःखात; मग घरट्यात ठेवलं दुसरं अंडं, पुढे काय घडलं बघा...

Makar Sankranti 2026 Recipes: पारंपारिकतेला आधुनिक ट्विस्ट; यंदा मकर संक्रांतीसाठी बनवा 'हे' ५ नवीन तिळाचे गोड पदार्थ

SBI Job Vacancy 2026: बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती; 1,146 जागांवर होणार नियुक्ती, 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

Nashik Crime : बसस्थानकांवरील महिला प्रवाशांचे दागिने चोरणारी 'लेडी चोर' जेरबंद; सीसीटीव्हीमुळे फुटले बिंग

घरोघरी प्रचार मागे, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स पुढे! बीएमसी निवडणुकीत प्रचाराचे डिजिटल रूप; व्हॉट्सअ‍ॅप ठरतेय उमेदवारांचे मुख्य अस्त्र

SCROLL FOR NEXT