Crime News esakal
कोल्हापूर

Belgaum Crime : मतभेदामुळं जवानाच्या पत्नीची सात वर्षांच्या चिमुरडीसह गळफास घेऊन आत्महत्या

कौटुंबिक कलह आणि सातत्याने कुटुंबाचा जाच सहन न झाल्याने टोकाची भूमिका घेऊन महादेवी हिने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

कौटुंबिक वाद व मतभेदामुळे ती काही दिवस अस्वस्थ होती. त्यातूनच तिने आज मुलीसह जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.

बेळगाव : चिमुकल्या सात वर्षांच्या बालिकेसह मातेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (ता. १०) कित्तूरजवळ (Kittur Karnataka) दिंडलकोप्प येथे घडली. महादेवी इंचल (वय ३४) असे मातेचे नाव आहे, तर चांदणी इंचल (वय ७) मृत बालिकेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, कौटुंबिक कलह आणि सातत्याने कुटुंबाचा जाच सहन न झाल्याने टोकाची भूमिका घेऊन महादेवी हिने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. गोकाक येथील जवानाशी महादेवी हिचा विवाह झाला होता. मात्र, सात वर्षांपूर्वी पतीचे अकाली निधन झाले.

त्यामुळे महादेवी मुलीसह माहेरी राहण्यासाठी दिंडलकोप्पला आली होती. कौटुंबिक वाद व मतभेदामुळे ती काही दिवस अस्वस्थ होती. त्यातूनच तिने आज मुलीसह जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कुटुंबातील मतभेद लक्षात घेऊन महादेवी स्वतंत्र राहण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र, घरच्या लोकांनी त्याला आक्षेप घेऊन विरोध दर्शविला. कुटुंबाचा त्रास व जाचामुळे महादेवीने जीवनाची अखेर केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT