In Belgaum robot doing service to corona patient 
कोल्हापूर

बेळगावात रोबोट करतोय कोरोनाग्रस्तांची सेवा, कसा आहे 'हा' रोबोट वाचा...

सकाळवृत्तसेवा

निपाणी (बेळगाव) - कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. पण या रोबोट निर्मितीमुळे धोका टळला आहे. एकाचवेळी आठ ते दहा संसर्ग झालेल्या रुग्णांना रोबोट सेवा देऊ शकतो. रुग्णाला औषधे, पाणी, जेवण यासह बेडशीट, टॉवेल अशा वस्तू तो पुरवितो. रोबोट बॅटरीवर चालत असून 7 तास सतत कार्य करू शकतो. विशेष म्हणजे रोबोटचे ऑपरेटिंग मोबाईलद्वारे कोठूनही करता येते.

कोरोनाच्या रुग्णांना सेवा देताना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन येथील भारतीय विचार मंचने अद्ययावत रोबोटची निर्मिती केली आहे. शिवाय आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी हा रोबोट मंचने बेळगाव सिव्हिल रुग्णालयाकडे सुपूर्द केला आहे.

याबद्दल मंचकडून मिळालेली माहिती अशी,
येथील अभियंते शैलेंद्र पारीख यांच्या नेतृत्वाखाली तुलसीदास साळुंखे, भरत कुरपे व भानुदास साळुंखे यांनी रोबोटची निर्मिती केली आहे. रोबोट निर्माण करण्यासाठी चाळीस हजार रुपये खर्च आला आहे. या प्रोजेक्‍टला विश्वेश्वरय्या तंत्र विद्यापीठाकडून आर्थिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल शैलेंद्र पारीख म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय विचार मंच व सेवा भारती यांच्या संयुक्त सहकार्याने हा सामाजिक उपक्रम यशस्वी राबविला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेक इन इंडिया संकल्पना उपयुक्त ठरली आहे.'

रोबोट लोकार्पण कार्यक्रमास रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, खासदार डॉ. प्रभाकर कोरे ,आमदार अभय पाटील, अनिल बेनके, जिल्हाधिकारी एस. बी.बोम्मणहळ्ळी, वरिष्ठ अधिकारी राजेंद्र चोळण, आरोग्य अधिकारी विनय धास्तीकोप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT