Belgaum youths in the United States are currently supporting each other 
कोल्हापूर

अमेरिकेत असलेले बेळगावातील युवक देत आहेत एकमेकांना धीर... पण इकडे घराच्यांची मात्र होतेय घालमेल...

मिलिंद देसाई

बेळगाव - शिक्षण आणि नोकरी निमित्त साता समुद्रापार अमेरिकेत असणारे बेळगावातील युवक सध्या एकमेकांचा आधार ठरु लागले आहेत. अमेरिकेत कोरोनाचे संकट अधिक गडद बनत चालले आहे. अशा परिस्थितीत घरापासुन दुर असले तरी आपल्या भागातील विद्यार्थी व इतर व्यवसाय करणाऱ्या लोकांशी संवाद साधत एकमेकांना धिर देण्याचा प्रयत्न बेळगावचे युवक करु लागले आहेत. मात्र बेळगाव आणि परिसरात राहणाऱ्या त्या युवकांच्या कुटुंबियांची घालमेल मात्र कायम असली तरीही देशापासुन दुर असलेले युवक 'एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ' हा संत तुकारामानी दिलेला मंत्र जपण्याचे काम करीत आहेत.

हिंदवाडी येथील आदित्य संजीव किल्लेकर हा युवक 2016 पासुन अमेरीकेत असुन कॅलिफोर्निया येथील युनिव्हर्ससिटी ऑफ सदर्न येथे एस.एस करण्यासाठी गेला त्यानंतर युनिव्हर्ससिटीत पाचव्या क्रमांकाने उत्तिर्ण झाल्यानंतर लॉस एंजिल येथे शास्त्रज्ञ म्हणुन काम करीत आहे. मात्र अमेरिकेत कोरोनाचे संकट वाढल्यानंतर वर्क फॉर होम करण्याची सुचना करण्यात आली आहे. परंतु आदित्य बरोबर राहणाऱ्या चार युवकांच्या घरातील लोकांना लागलेली काळजी पाहुन आदित्य व त्याच्या मित्रांनी अमेरिकेत असलेल्या आपल्या ओळखीच्या लोकांबरोबर मोबाईद्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही समस्या असल्यास एकमेकांना मदत करण्याचे ठरविले आहे अशी माहिती आदित्यने आपल्या आई वडीलांशी बोलताना दिली आहे.

देशभरातील अनेक जण व्यवसाय, शिक्षण आणि नोकरीनिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत त्या सर्वांचीच काळजी कोरोनाच्या भितीमुळे  परदेशात असलेल्या आपल्या मुलांच्या काळजीने आई वडीलांची मात्र मोठी घालमेल होऊ लागली असुन सर्व जण कोरोनाचे संकट दुर व्हावे आणि परदेशातील सर्व भारतीय सुखरुपणे आपल्या घरी परत यावेत अशी प्रार्थना करु लागले आहेत.

सध्याची अमेरिकेची स्थिती पाहता आम्हाला काळजी वाटत असुन आम्हाला धिर देण्यासाठी मुलगा दररोज व्हिडिओ कॉल करुन बोलत आहे. 'मी ठिक आहे माझी काळजी करु नका...' असे सांगतोय पण सारखी काळजी लागुन राहीली आहे. वर्क फॉर होम करीत असल्याची माहिती देतोय पण कधी एकदा कोरोनाचे संकट दुर होते असे झाले आहे.

- भारती किल्लेकर, हिंदवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढच्या तीन तासात अति मुसळधार पावसाची शक्यता

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT