The bike had been parked on Club Road for more than two and a half months 
कोल्हापूर

'ती' अडीच महिने रस्त्यावरच बेवारस थांबून होती अन...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - सांगली येथील प्रशांत नोकरीच्या निमित्ताने बेळगावातील एका लॉजमध्ये वास्तव्यास होते. 12 मार्च रोजी ते दुचाकीवरून क्‍लब रोडवर गेले. रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यानी दुचाकी तेथील एका व्यापारी संकुलासमोर लावली, दुचाकीलाच हेल्मेट अडकले. पायी चालत जावून त्यानी कामही पूर्ण केले. त्याच दिवशी सायंकाळी त्याना सांगलीला जायचे होते, त्यामुळे ते चालतच लॉजवर गेले. दुचाकी क्‍लब रोडवर लावल्याचे त्यांच्या लक्षातच राहिले नाही. ते सांगलीला गेले अन लॉक डाऊन लागू झाला, ते सांगली येथेच अडकून पडले. आपली दुचाकी लॉजमध्येच आहे अशी त्यांची समजूत होती.

प्रत्यक्षात दुचाकी तब्बल अडीच महिन्यापेक्षा अधिक काळ क्‍लब रोडवरच थांबून होती. आश्‍चर्य म्हणजे या काळात दुचाकीला कोणी हात लावला नाहीच, गाडीवरील हेल्मेटही कोणी नेले नाही. तेथील व्यापारी संकुलाचे मालक दररोज ती दुचाकी बघत होते, ती एकाच जागी थांबून होती. त्यानी मग प्रसारमाध्यमांना त्याची माहिती दिली, त्याची बातमी प्रसिद्ध झाली. पण प्रशांत बेळगावात नसल्यामुळे ती बातमी वाचता आली नाही. मग व्यापारी संकुलाच्या मालकांनी कॅंप पोलिस ठाण्याला त्या दुचाकीची माहिती दिली, पोलिसानी ती दुचाकी ताब्यात घेतली. तब्बल तीन महिन्यांनी प्रशांत बेळगावात परत आले. त्यांनी लॉजच्या पार्कींगमध्ये आपली दुचाकी शोधली, पण ती सापडली. दुचाकीची चोरी झाल्याचा संशय त्यानी व्यक्त केला, पण लॉज मालकानी त्याचा इन्कार केला. यावर त्यानी लॉजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चित्रण तपासण्याचा निर्णय घेतला. लॉज मालकांनीही त्याला संमती दिली. शिवाय प्रशांत यांनी 12 मार्च रोजीचा संपूर्ण दिवस डोळ्यासमोर आणला व दुचाकी कोठे ठेवली आहे का हे आठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याना काहीच आठवले नाही. लॉक डाऊन, आर्थिक तंगी त्याच दुचाकी गायब यामुळे नाराज झालेल्या प्रशांत यानी शनिवारी आपली व्यथा तेथील कॅन्टीनमालकांना सांगीतली.

प्रसारमाध्यमाचा प्रतिनिधीही त्यावेळी तेथे उपस्थित होता, त्याने ती व्यथा ऐकली. जून महिन्यात क्‍लब रोडवरील संकुलाच्या मालकांने त्याला बेवारस दुचाकीचे फोटो पाठविले होते. त्याला ती बाब आठवली व त्याने आपल्याकडील दुचाकीचे फोटो प्रशांत याना दाखविले. त्यावर प्रशांत याना आश्‍चर्याचा धक्काच बसला, आपलीच दुचाकी असल्याचे त्यानी सांगीतले. तातडीने संकुलाच्या मालकांशी संपर्क साधून विचारणा करण्यात आली. त्यावर दुचाकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे त्यानी सांगीतले. आता ती दुचाकी पोलिसांकडून प्रशांत याना परत मिळेलही. पण अडीच महिने त्या दुचाकीला कोणी हात कसा लावला नाही? त्या दुचाकीची चोरी कशी झाली नाही? असे गंमतीदार प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates : खासदार ओमराजे निंबाळकरांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; जनसंपर्कात अडथळा

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT