Biodiversity Management Committee set up by the Municipal Corporation for the protection and conservation of biodiversity update kolhapur news 
कोल्हापूर

जैवविविधता समिती अन्‌ दर्शनासाठीची खास बस! 

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर :   पर्यावरणपूरक अनेक उपक्रम यशस्वीच नव्हे तर राज्यासाठी मॉडेल म्हणून देणाऱ्या अनेक संकल्पना कोल्हापूर महापालिकेने यशस्वी केल्या; पण जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अस्तित्व फक्त कागदावरच आहे. या समितीबाबतचा ठराव राज्याच्या जैवविविधता मंडळाला पाठवण्यापलीकडे कुठलीच कार्यवाही या समितीकडून झालेली नाही. 

राज्याच्या जैविक विविधता अधिनियमानुसार (2002) सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायतींनी जैवविविधतेच्या संरक्षणासाठी व्यवस्थापन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीमार्फत परिसरात आढळणारी झाडे, पक्षी, प्राणी, फुलपाखरे, कीटक यांची नोंद तसेच त्यांच्यात होणाऱ्या बदलांची नोंद नियमितपणे करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्‍यक उपाययोजना करणे सोपे जाईल. ही नोंदवही तयार करण्यासाठी राज्य मंडळाकडून निधीही दिला जातो.

राज्य सरकारने 2016 मध्ये काढलेल्या अध्यादेशानुसार कोल्हापूर महापालिकेने जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन केली. विज्ञान प्रबोधिनी आणि निसर्गमित्र या संस्थांच्या कामामुळे नोंदवही तयार करणे सहज शक्‍य झाले. दिल्लीतील एका संस्थेला शहरातील एका झाडाचा अभ्यास करण्यासाठी परवानगी देण्यात आली. म्हणजेच यातून उत्पन्न मिळवणेही शक्‍य आहे. मात्र, अजूनही पुढील कोणतीच कार्यवाही झालेली नाही. मुळात या समितीवर अधिकाऱ्यांबरोबर अशासकीय व्यक्तींच्याही नेमणूका झाल्या आहेत; पण अनेक अधिकारीही याबाबत अनभिज्ञ आहेत. 

जगभरात जैवविविधतेसाठी हॉटस्पॉट म्हणून ओळखण्यात येणाऱ्या पश्‍चिम घाटाचा 40 टक्के भाग महाराष्ट्रात आहे. यात कोल्हापूर जिल्हा आहे, ही जमेची बाजू. जिल्ह्यातील सहा ते सात तालुके हे थेट पश्‍चिम घाटाशी संबंधित; पण पश्‍चिम घाटाची स्थिती फारशी चांगली नाही. जैववैविध्याचा दस्तऐवज जतन करण्याबरोबर नष्ट होणाऱ्या वनसंपदेची कारणे शोधणे त्याशिवाय प्रशासनाबरोबरच लोकसहभागातून जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी सर्वंकष नियोजनावर आधारित उपक्रम राबविण्यावर भर द्यावा लागणार आहे. मात्र, कोल्हापूर महापालिकेत ही समिती अजूनही कागदोपत्रीच आहे. 


महापौरांची केवळ एक सहल... 
जैवविविधता ही प्रत्येकाने समजून घेण्याची गोष्ट आहे. त्याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे; कारण, ही जैवविविधता आपल्या जगण्याचा मूलाधार आहे. या पार्श्‍वभूमीवर या समितीचे काम महत्वाचे आहे. जैवविविधतेने नटलेल्या शहर परिसरातील जैविकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या रंकाळा तलाव, टाऊन हॉल, शिवाजी विद्यापीठ, न्यू पॅलेस यांसारख्या ठिकाणांची यादी तयार झाली आहे. हुतात्मा उद्यान येथे फुलपाखरांसाठी बटरफ्लाय झोन विकसित करून तो नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्याची चर्चाही झाली.

शहरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना, वृक्षप्रेमी, पर्यटकांना जैवविविधतेंतर्गत दुर्मिळ प्रजाती पाहण्यासाठी "केएमटी'तर्फे दर रविवारी खास बससेवा उपलब्ध करून देण्याचा विचारही पुढे आला. ही बस टाऊन हॉल- महावीर गार्डन- विवेकानंद कॉलेज- कृषी महाविद्यालय- शिवाजी विद्यापीठ- हुतात्मा पार्क- बेलबाग मार्गे शिवाजी चौक असा मार्ग ठरविण्यात आला. त्यासाठी प्रतिव्यक्तीस 72 रुपये तिकीट आकारण्याचा निर्णयही झाला. उदय गायकवाड आणि अनिल चौगुले यांनी विनामोबदला गाईड म्हणून काम करण्याची तयारीही दर्शवली; पण महापौरांची एक सहल वगळता ही खास बससेवाही अजूनही कागदावरच आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT