The birthday party kicks off in gadhinglaj kolhapur marathi news 
कोल्हापूर

त्याने केले पार्टीचे नियोजन पण आले अंगलट...

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज (कोल्हापूर) : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी असतानाही मुलाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. शरद शिवराम येसरे (वय 50, रा. कोड्ड कॉलनी, गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. अशा प्रकारचा गुन्हा गडहिंग्लज तालुक्‍यात प्रथमच दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करीत वाढदिवसाचा हा कार्यक्रम बंद पाडला. 

गर्दीमुळे पोलिसांनी बंद पाडला कार्यक्रम 
कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी शासन पातळीवरुन विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घातलेली आहे. त्याबाबतची माहिती माध्यमातून देण्यात आली आहे. तसेच पोलिस प्रशासनामार्फतही नागरिकांना आवाहन केले जात आहे. असे असतानाही शरद येसरे यांनी आपला मुलगा सौरभ याच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता.20) सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोड्ड कॉलनीतील राहत्या घरी मित्रपरिवार व नातेवाईक अशा 50 ते 60 लोकांना एकत्र बोलावले होते.

मुलाचा वाढदिवस आला अंगलट
दरम्यान, कोड्ड कॉलनीत कार्यक्रमासाठी गर्दी झाल्याची माहिती पोलिसांना कळाली. पोलिस तातडीने कोड्ड कॉलनीत दाखल झाले. त्यांनी हस्तक्षेप करीत सदरचा कार्यक्रम बंद करण्यास भाग पाडले. वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या नावाखाली मित्रपरिवार व नातेवाइकांना बोलावून जमाव गोळा करुन लोकसेवकांचा आदेश पाळला नसल्याबद्दल शरद येसरे याच्याविरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेडकॉंस्टेबल विनोद पवार यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिस नाईक राजाराम सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT