कोल्हापूर

स्वप्नीलच्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार; भाजपचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (Maharashtra Public Service Commission) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नेमणूक होत नसल्याने स्वप्नील लोणकर (Swapnil Lonakar)याने गळफास घेत आत्महत्या केली. महाराष्ट्र लोकसेवेची पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे त्याची मुलाखत झाली नाही. नैराश्यात जाऊन स्वप्नीलने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. या आत्महत्येला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असा आरोप करत महाविकास आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. (bjp-allegations-swapnil-lonkar-protests-in-front-of-the-collector-kolhapur-news)

मंत्र्यांचा सुरू आहे, मनमानी कारभार, सुशिक्षित विद्यार्थी मात्र बेरोजगार’, परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या कधी मिळणार? महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, असे फलक घेत घोषणाबाजी केली. यानंतर शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन दिले. यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, स्वप्नीलच्या कुटुंबीयांना ५० लाख भरपाई द्यावी, आदी मागण्या केल्या. सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्तीअभावी नैराश्यातून आत्महत्येचा शेवटचा निर्णय घेत आहेत, हे गंभीर आहे.

संघटन सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, ‘न्यायालयीन आदेश असताना सुद्धा अनेक विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत.’ कार्यकारिणी सदस्य महेश जाधव म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारने या दीड वर्षामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे कार्य केले नाही.’ जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या अभद्र युतीमुळे सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही.’

यावेळी दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, चंद्रकांत घाटगे, सचिन तोडकर, दिग्विजय कालेकर, अमोल पलोजी, विजय खाडे, विवेक कुलकर्णी, आशिष कपडेकर, भरत काळे, दिनेश पसारे, तानाजी निकम, दिलीप बोंद्रे, संदीप कुंभार, महेश यादव, सुनील पाटील, राजाराम परीट, प्रीतम यादव, सचिन साळोखे, सचिन सुतार, अनिल पाटील, हर्षद कुंभोजकर, अमर साठे, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, दत्ता लोखंडे, अभिजित शिंदे, महेश जाधव, बापू राणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT