BJP leader Chitra Wagh vs Sharad Pawar esakal
कोल्हापूर

Chitra Wagh : शरद पवारांच्या पक्षातील दुसरी पिढी कमकुवत, हे पाहून वाईट वाटतं; चित्रा वाघ यांचा निशाणा

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडून येणार हे नक्की आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडीचे लक्ष भाजपकडे आहे. आमची काळजी करू नका, आमचे नेते देवेंद्र फडणवीस प्रगल्भ आहेत.

कोल्हापूर : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षातील दुसरी पिढी कमकुवत आहे. म्हणूनच त्यांना या वयात जिल्ह्यात फिरावे लागते. तालुक्यात लक्ष घालावे लागते. हे पाहून वाईट वाटते, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली. त्‍या कोल्हापूर दौऱ्यावर आल्‍या असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी वाघ म्हणाल्या, ‘अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कामाचा आवाका प्रचंड आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडून येणार हे नक्की आहे. जागावाटपावरून महाविकास आघाडी टीका करत आहे. प्रत्यक्षात यांच्या घराला आग लागली. पण, महाविकास आघाडीचे लक्ष भाजपकडे आहे. आमची काळजी करू नका, आमचे नेते देवेंद्र फडणवीस प्रगल्भ आहेत.

महाविकास आघाडीचे नेते काही बोलताहेत त्यात काही तथ्य नाही. जे होणार ते देवेंद्र फडणवीस चांगल्या पद्धतीने करतील, असा आम्हाला विश्वास आहे. विरोधक रोज सकाळी यायचे आणि तुतारी वाजवत आहेत. मीडिया हेच त्यांचे कुरूक्षेत्र आहे. शब्दांचे पोकळ बाण सोडणे एवढेच त्यांचे काम आहे. त्यांनी जमिनीवरील वस्तुस्थिती पाहिली तर त्यांच्या वल्गना बंद होतील.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT