bjp mla gopichand padalkar criticism on ncp leader sharad pawar
bjp mla gopichand padalkar criticism on ncp leader sharad pawar 
कोल्हापूर

चार खासदारांच्या पक्षाचे अध्यक्ष लोकनेते तर..., भाजप आमदाराची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका

अजित झळके

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार हे चार खासदारांचे लोकनेते आहेत अशी नाव न घेता त्यांनी आज टीका केली. 

सांगलीत पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारा निमित्त भाजपने आज पदवीधरांचा मेळावा आयोजित केला होता, यावेळी बोलताना भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार शरद पवार यांचे नाव न घेता चार खासदारांच्या नेत्यांना लोकनेता म्हणतात मग 303 खासदारांच्या नेत्यांना काय म्हणणार, तुम्ही मोदींवर टीका करता. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुमच्यावर टीका करू नये, असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

आमदार पडळकर यांनी यापूर्वीही शरद पवार हे राज्याला लागलेला कोरोना आहे अशी टीका केली होती. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आज पुन्हा एकदा आमदार पळकर यांची शरद पवार यांच्यावर जीभ घसरली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे निर्माण झालेला वादंग ताजा असतानाच पडळकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या पक्षाचे 4 खासदार आहेत त्यांना लोकनेते म्हणताय मग 303 खासदार निवडून आणणाऱ्या मोदी यांच्या नेतृत्वाला काय म्हणायचे' असा सवाल करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीला डिवचले आहे.

भाजपच्या केंद्र सरकारमधील नेतृत्वावर राष्ट्रवादीचे नेते टीका करत असतात. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काम करते. त्यांच्या पक्षाचे चार खासदार असून त्यांना लोकनेते म्हटले जात आहे. त्यामुळे ज्या पक्षाचे 303 खासदार आहे, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला काय म्हणणार? असा सवाल पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला आहे. शिवाय 'जनतेचा विश्वासघात करून  हे सरकार आले आहे. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आम्हाला अडवणारे कुणीही नाही असा त्यांचा हा गैरसमज झाला आहे' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT