bjp president chandrakant patil crime crime on hasan mushrif 
कोल्हापूर

माझा जप केल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा

नेसरी - दिवसभरात दहा वेळा माझ्या नावाचा जप केल्याशिवाय मंत्री जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांना झोप लागत नाही. त्यांच्या भाषणाच्या सुरवातीपासून अखेरपर्यंत माझेच नाव त्यांच्या तोंडात असते. चंद्रकांत पाटलांना शिव्या घातल्या म्हणजे शरद पवारांकडे महत्त्व वाढते, म्हणूनच हे दोघेही माझ्यावर बोलण्याची संधी सोडत नाहीत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे लगावला. 

येथे पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख, शिक्षक मतदारसंघाचे भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 

श्री. पाटील म्हणाले, की पुणे पदवीधर मतदारसंघाचा १२ वर्षे मी आमदार होतो. गेली पाच वर्षे मंत्री असताना पदवीधर, शिक्षकांचे अनेक प्रलंबीत प्रश्‍न मार्गी लावले आहेत. विकासाची परंपरा पुढे नेण्यासाठी पुणे पदवीर मतदारसंघाचे उमेदवार देशमुख, शिक्षक उमेदवार जितेंद्र पवार यांना पहिल्या पसंतीचे मतदान करून विजयी करा. बारा वर्षात मी पदवीधर व शिक्षकांचा विकास साधला आहे. तरीसुद्धा विरोधक माझ्यावर टीका करून पवार यांच्यासमोर महत्व वाढवून घेत आहेत.’’

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. हेमंत कोलेकर यांनी स्वागत केले. प्रदेश सरचिटणीस शिवाजी पाटील, मारूती राक्षे,  जयश्री तेली, नामदेव पाटील, नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील, अनिल खोत, संदीप नाथबुवा, संतोष तेली, प्रकाश गुरव, आदी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT