bjp president rahul chikode criticized for government kolhapur 
कोल्हापूर

वीज बिले म्हणजे जखमेवर मीठ; राहूल चिक्कोडे

औंकार धर्माधिकारी

कोल्हापूर: लॉकडाउनच्या काळात कष्टकऱ्यांचा रोजगार गेला. साठवलेले पैसे उपजिविकेसाठी खर्च झाले. त्यातच विजेची बिले वाढिव रक्कमेसह देण्यात आली. राज्य सरकारचा हा प्रकार म्हणजे गोरगरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. वाढीव बिले तातडीने रद्द झालीच पाहीजेत. कोल्हापुरातील नागरिक बिल भरणार नाहीत. असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल चिकोडे यांनी राज्य सरकारला दिला. महावितरणच्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर भाजपने वीज बिलांची होळी करून सरकारचा निषेध केला. या आंदोलनात चिकोडे बोलत होते.


वीज बिल माफ केली जात नसल्याचा निषेध करण्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन केले. शहरातही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दुपारी अकरा वाजता महावितरण कार्यालयासमोर भाजप कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या "पलटी सरकारचा धिक्कार असो', "वीज बिल माफ झालेच पाहीजे'. या घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. त्यानंतर वीज बिलाची होळी करण्यात आली.

यावेळी चिकोडे म्हणाले,"लॉकडाउनच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे कष्टकरी लोकांचे हाल झाले. नोकरदार वर्गाला पगार कपातीला सामोरे जावे लागले. सर्वत्र आर्थिक चणचण होती. नागरिकांची ही स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेशनवर गरजूंसाठी मोफत धान्य दिले. पण राज्य सरकारने या कालावधीत वाढीव वीज बिल देऊन गरीबांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे वीज बिल भरू नये. सरकारने ते माफच केले पाहीजे. नागरिकांनी वीज बिल भरू नये. शिवाय जर कोणी कनेक्‍शन कट करण्यासाठी आले तर भाजप कार्यालयाशी संपर्क करावा.'


यावेळी सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, अमोल पालोजी, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, गायत्री राऊत, डॉ.सदानंद राजवर्धन, विवेक वोरा, दिलीप बोंद्रे, प्रग्नेश हमलाई, डॉ.राजवर्धन, भरत काळे, सुशांत पाटील, अभीजीत शिंदे, धीरज पाटील, संजय जासूद, गिरीश साळुंखे, दिग्वीजय कालेकर, विजय अग्रवाल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्ते झाले संतप्त
आंदोलन सुरू असताना एक एस.टी.बस कार्यकर्त्यांच्या जवळून गेली. तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांची गाडी आल्यावर त्यांना सोडण्याची सूचना पोलिसांनी केली. यावर कार्यकर्ते संतप्त झाले. आम्ही परवानगी घेऊन आंदोलन करत आहोत. असे असताना पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन का केले नाही. असा जाब यावेळी पोलिसांना विचारण्यात आला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मध्ये रिंगण करून आंदोलन केले.


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT